श्री हावगीस्वामी महाविद्यालयास तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत दोन पारितोषिके
उदगीर (प्रतिनिधी) : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा जनता विकास परिषद उदगीर शाखेच्या वतीने महाविद्यालयीन गटासाठी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर आजच्या युवकांची विकासात्मक भूमिका या विषयावर तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील कु.रेणुका राजकुमार जाधव बी.कॉम.तृतीय वर्ष यांनी दुसरे तर कु.प्रांजल संतोष स्वामी बी.ए.प्रथम वर्ष यांनी तिसरे पारितोषिक प्राप्त केले.बक्षिसाचे स्वरूप अनुक्रमे २००० व १००० रुपये, प्रमाणपत्र , समृतिचिन्ह व ग्रंथ असे होते.
याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे, सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे , कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे , संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य , प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर , उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे , निबंध , वक्तृत्व व वादविवाद मंडळ समितीचे प्रमुख डॉ.म.ई.तंगावार , सदस्य प्रा.वसंत पवार, डॉ.दत्ताहरी होनराव , प्रा.धनराज बंडे , प्रा.अजित रंगदळ , प्रा.जे.डी.संपाळे , प्रा.एन.आर.हाके, प्रा.मनोहर भालके तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.