यशवंत विद्यालयात हात धुवादिन व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

यशवंत विद्यालयात हात धुवादिन व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयात जागतिक हात धुवा दिन व एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी मुलांना हात कसे धुवावे याची प्रात्यक्षिक प्राचार्य गजानन शिंदे यांनी करून दाखविले. परवेक्षक राम तत्तापुरे यांनी हात धुवायची महाराष्ट्र शासनाची शपथ विद्यार्थ्यांना देऊन वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन विभाग प्रमुख कपिल बिराजदार यांनी तर आभारराजेश कज्जेवाड यांनी मांनले. यावेळी उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, परवेक्षक अशोक पेदेवाड यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!