शालेय विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी किलबिल च्या खेळाडूंची निवड

शालेय विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी किलबिल च्या खेळाडूंची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : दि.16 ऑक्टोबर 2023 रोजी क्रीडा संकुल लातूर येथे नुकतीच शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा पार पडली . सदरील स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूल शाळेतील विद्यार्थी नागरगोजे सत्यवान प्रभाकर, शेख रेहान रसुलसाब आणि शेख उवेस अशरफ या तीन विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. या विद्यार्थ्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना इरफान अकोले व विशाल सरवदे या क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे शाळेकडून संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले प्राचार्य संतोष पाटील ,पर्यवेक्षक गोडभरले व क्रीडा विभागाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!