भाजपची नमो पंचायत राज रथयात्रा बैठक संपन्न,जळकोटचे माजी नगराध्यक्ष किशन गुरुजींना मराठवाड्याची जबाबदारी
जळकोट (एल.पी.उगीले) : भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभागाची भाजपा प्रदेश कार्यालयात “नमो पंचायतराज रथयात्रा” बैठक संपन्न झाली. यात जळकोटचे माजी नगराध्यक्ष किशन गुरुजी धुळशेट्टे यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. सदरील यात्रेची मराठवाडा नियोजनाची संयुक्त जबाबदारी त्यांच्यावर असून उत्तर मराठवाडा संयोजक प्रल्हाद कदम यांची साथ लाभणार आहे. या महत्वपूर्ण बैठकीला पंचायत राज व ग्राम विकास विभागाचे प्रदेश संयोजक गणेश काका जगताप, प्रदेश सहसंयोजक वैशालीताई नागरे, प्रदेश सहसंयोजक संतोष जी चौधरी, दक्षिण मराठवाडा संयोजक तथा जळकोटचे माजी नगराध्यक्ष किशन गुरुजी धुळशेटे , उत्तर मराठवाडा संयोजक प्रल्हाद कदम , नासिक विभाग संयोजक रोहिदास धुमाळ,कोकण विभाग संयोजक प्रवीण गावडे,पश्चिम महाराष्ट्र संयोजक निनाद पटवर्धन, नागपूर विभाग संयोजक विवेक देशकर, अमरावती विभाग संयोजक सत्यजित परिहार हे उपस्थित होते.