अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात २ कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांना मंजुरी

अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात २ कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांना मंजुरी

अहमदपूर( गोविंद काळे )राज्य सरकारच्या वतीने सन २०२३ २४ या आर्थिक वर्षासाठी रस्ते आणि पूल परीक्षण कार्यक्रम अंतर्गत गट-ब मधील कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील हडोळती ते थोट सावरगाव, राष्ट्रीय महामार्ग ते उमरगा कोर्ट आणि चाकूर तालुक्यातील मोहदळ पाटी ते मोहदळ, कारखाना ते देवांग्रा अशा कामांचा समावेश आहे. या विविध विकासकामांसाठी अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.

अहमदपूर तालुक्यातील हडोळती ते थोट सावरगाव : ६० लक्ष रुपये, राष्ट्रीय महामार्ग ते उमरगा कोर्ट : ५० लक्ष रुपये, आणि चाकूर तालुक्यातील मोहदळ पाटी ते मोहदळ : ४० लक्ष रुपये, कारखाना ते देवांग्रा : ५० लक्ष रुपये अशा एकूण २ कोटी रुपयांचा निधी या कामांना मंजूर करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी थोट सावरगाव येथील ग्रामस्थांनी चुलबंद आंदोलन केले होते. याची दखल घेत आमदार बाबासाहेब पाटील यांनी शासन दरबारी तात्काळ प्रश्न मार्गी लागावा यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून मतदारसंघातील चार प्रमुख रस्त्यांना दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

About The Author