पत्रकार डॉ. बासिदखान पठाण “उत्कृष्ट पत्रकारिता – २०२३” या पुरस्काराने सन्मानित
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यात गेल्या १७ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रातुन आपला वेगळा ठसा उमटविनारे समविचारी पत्रकार संघाचे अध्यक्ष , संपादक तथा पत्रकार डॉ. बासिदखान पठाण यांना जी-टाउन च्या वतिने दिला जानारा ” उत्कृष्ट पत्रकारिता – २०२३ ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्रीमती मेनकाजी गांधी यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून जेलर दिपकजी शर्मा , डॉ. मुकेश चंद्रा कमिशनर आँफ दिल्ली पोलीस , लिवलीना चक्रवर्ती अँक्टर , अँड.सिमा पटनाहा सुप्रिम कोर्ट आँफ इंडिया, इंद्रजित घोश ग्लोबल चेअरमन ( एम.एस.एम.इ चेम्बर आँफ काँमर्स ) , डॉ. दिवाकर गोयल चेअरमन एरो अक्यँडमी आँफ अँव्हिशन यांची उपस्थिती होती.
जी-टाउन च्या वतिने देशभरातुन दर वर्षी विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ व्यक्तींची निवड करुन त्यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते .२५ सन्मानित व्यक्तिं मध्ये अहमदपूर शहरातील जनसामान्यांच्या अनेक अडचनींना वाचा फोडुन त्या अडचणींना दुर करण्याचा प्रयत्न करणारे तसेच अनेक भ्रष्ट व कामचुकार अधिकारी , कर्मचारी यांना त्यांच्या खुर्ची ( पदावरून ) निलंबीत करण्यापर्यंत लढा देणारे, पत्रकारिता क्षेत्रात गेली १७ वर्षापासुन कार्यरत असलेले ज्यांनी पत्रकारिता क्षेत्रातच पी.एच.डी केली त्यांना जनसामांन्यानी निष्कलंक निर्भीड पत्रकार अशी ओळख दिली असे डॉ. बासिदखान पठाण यांना उत्कृष्ट पत्रकारिता २०२३ या पुरस्काराने दि.२९.१०.२०२३ रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले आहे.
या बद्दल डॉ. बासिदखान पठाण यांना लक्ष्मण अलगुले, महेशअण्णा चौधरी, दत्ता शिंदे, प्रकाश ससाने,हनिफ शेख,जिवनराव बोंडगे, अजित सांगविकर, मनोज कुमदळे, निसार बिस्ती,प्रा.गणेश मदणे,प्रा.सादिक शेख,चंद्रकांत आरसुळ, पांडु केंद्रे, जुबेर पठाण, महादु स्वामी, हारुण शेख,शादुल शेख आदींसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या.