शिरूर ताजबंद येथे साखळी उपोषणास सुरुवात

शिरूर ताजबंद येथे साखळी उपोषणास सुरुवात

अहमदपूर (गोविंद काळे) : छत्रपती शिवाजी महाराज चौक शिरूर ताजबंद येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असता यावेळी एक मराठा लाख मराठा च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, आपल्याकडे पुरावे सापडले असून ही हा शासनाचा वेळ काढूपणा कामाचा नाही. सरकारने मराठा आरक्षणावर त्वरित निर्णय जाहीर करावा तसेच परस्थिती चिघळणार नाही याची काळजी शासनाने घेणं गरजेचं आहे. अशी मागणी अंदोलकांकडून करण्यात आली आहे.

About The Author

error: Content is protected !!