नाबार्ड अंतर्गंत उदगीर तालुक्यातील रस्त्यासाठी ३ कोटी ५० लक्ष रुपयाचा निधी मंजुर – संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील नागरिकांना शहरात ये – जा करण्यासाठी अडचण निर्माण होत होती. म्हणून ग्रामीण भागातील नागरीकांनी ना.संजय बनसोडे यांच्याकडे रस्ता करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करुन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी नाबार्ड टप्पा – २९ (२०२३-२४) अंतर्गंत ३ कोटी ५० लक्ष रुपयाचा निधी मंजूर केल्याची माहिती ना.संजय बनसोडे यांनी दिली आहे. मतदार संघाचा चौफेर विकास करताना महापुरुषांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण, शहरातील शासकीय कार्यालयाच्या इमारती, प्रशाकीय इमारत, महसूल कर्मचा-यांचे निवासस्थान, पोलीस वसाहत, शादीखाना, बौध्दविहार, विविध सभागृहासह अंतर्गंत रस्ते, स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठ्याची योजना, यांच्यासह मतदार संघाला जोडणारे रस्ते पूर्ण झाले असुन भविष्यात ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेवुन त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे ना.संजय बनसोडे यांनी ग्रामीण भागातील नागरीकांना शहरात ये – जा करण्यासाठी नाबार्ड अंतर्गंत उदगीर तालुक्यातील प्रजिमा-४० ते सुगाव हिप्पळगाव थेरगाव रामा- २४० ते शिरूर अनंतपाळ देठणा देवर्जन शेकापूर ते प्रजिमा- ३७ रस्ता प्रजिमा- ३८ किमी १६/६०० शंभू उमरगा गावाजवळील नाल्यावर जोडरस्त्यासह पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी तर उदगीर तालुक्यातील रा.म.मा. ५० ते शेल्हाळ तोंडचीर- मुर्की ते राज्य सीमा रस्ता प्रजिमा – ३४ किमी ३/६०० मध्ये नाल्यावर जोडरस्त्यासह पुलाचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी ५० लक्ष असे एकुण ३ कोटी ५० लक्ष रुपयाचा निधी मंजूर केल्याने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे या भागातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.