अभिजीत औटे यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न अरोग्य पुरस्कार प्रदान
उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजीत अशोकराव औटे त्यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न आरोग्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती राष्ट्रीय एकात्माता दिन, स्वांतत्राचा अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने अभिजीत अशोकराव औटे यांना त्यांनी केलेल्या एकूण सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी यापूर्वी गेली दहा वर्ष अरोग्य शिबिराचे आयोजन करुन मोफत नेत्र तपासी, मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीर, मोफत दंत तपासणी शिबीर, मोफत मधुमेह व रक्त दाब तपासणी शिबीराच्या माध्यमातून रुग्णाची सेवा केलेली आहे तसेच अरोग्य जनजागृतीपर अभियान राबवलेला आहे. त्यांना यापूर्वीही 2016 चा महाराष्ट्र शासनाचा क्रिडा व युवक सेवासंचनलाय लातूर जिल्ह्य युवा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ते मागील विसवर्षा पासुन सामाजिक कार्ययात समाज सेवा केल्याबद्दल सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन सत्कार केला आहे. याप्रसंगी मणिभाई मानसेवा ट्रस्ट अध्यक्ष डाॅ रविंद्र भोळे, विद्या प्रसायणी मंडळ सचिव सतिश गवळी, मुख्य संपादक दै जनशक्ती यतिन ढाके, किसान मार्चा भाजप प्रदेश अध्यक्ष पोपटराव भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.