डॉ. नारायणराव चाटे कॉलेज ऑफ फार्मसी, चापोली च्या प्राचार्य पदी प्रा.डॉ. सचिन घोळवे यांची नियुक्ती
उदगीर (एल.पी.उगीले): उदगीर येथील श्यामलाल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी उपप्राचार्य भागवतराव घोळवे यांचे चिरंजीव डॉक्टर सचिन घोळवे यांची नियुक्ती प्राचार्यपदी झाल्याबद्दल उदगीर मध्ये आनंद उत्सव साजरा केला जात आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ, चापोली द्वारा संचालित डॉ. नारायणराव चाटे कॉलेज ऑफ फार्मसी या संस्थेत पी सी आय व महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने डी. फार्मसी व बी. फार्मसी अभ्यासक्रम चालवले जातात. या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदि विख्यात प्रा.डॉ.सचिन घोळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संस्थेचे सचिव व चापोलीचे लोकनियुक्त सरपंच डॉ. भालचंद्र चाटे व संजीवनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय चाटे यांच्या हस्ते प्रा. डॉ. सचिन घोळवे यांना प्राचार्य पदी नियुक्ती पत्र देण्यात आले.
प्रा. डॉ. सचिन घोळवे यांनी ११ वर्ष चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज, लातूर येथे कार्य केलेले असून मागील दोन वर्षापासून ते विभागप्रमुख, सहयोगी प्राध्यापक व आय क्यू ए सी समन्वयक पदावर कार्यरत होते. या पूर्वी डॉ. घोळवे यांनी सिप्ला, अल्केम, जॉन्सन अँड जॉन्सन, श्रेया लाईफ सायन्सेस या औषधी कंपन्यांमध्ये विविध पदावर ६ वर्षे कार्य केलेले आहे. डॉ. घोळवे हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू नामनिर्देशित विद्याशाखेचे सदस्य आहेत. डॉ. घोळवे यांचे ५० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिंबध व दोन पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांच्या तीन पेटंट्स ला भारत सरकारची मान्यता मिळाली आहे. फार्मसी विषयाच्या पदुत्तर विद्यार्थ्यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून डॉ.घोळवे कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ६० विद्यार्थ्यांनी एम. फार्म. पदवी प्राप्त केलेली आहे. डॉ.घोळवे यांना विविध स्तरावरील पुरस्कारांनी सन्माननीत केलेले असून सध्या ते आसोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया या संस्थेचे केंद्रीय कार्यकारी सदस्य आहेत. या नियुक्तीबद्दल फार्मसी व संजीवनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी डॉ. घोळवे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.