ग्रामीण भागातील रस्त्यासाठी 2 कोटींचा निधी मंजूर ना. संजय बनसोडे

ग्रामीण भागातील रस्त्यासाठी 2 कोटींचा निधी मंजूर ना. संजय बनसोडे

ग्रामीण

उदगीर (प्रतिनिधी) : ग्रामीण मतदारसंघातील उदगीर जळकोट तालुक्यातील एकूण नऊ रस्त्यांच्या कामाला ग्रामविकास विभागाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उदगीर मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणासाठी अडचण होत होती. ती अडचण लक्षात घेऊन व त्या – त्या भागातील नागरिकांनी ना. संजय बनसोडे यांच्याकडे नवीन रस्त्यासाठी मागणी केली होती. ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन ना. संजय बनसोडे यांनी उदगीर व जळकोट मतदार संघातील एकूण नऊ रस्त्यासाठी निधी मंजूर करुन घेतला आहे. त्यामध्ये उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. ते वाढवणा खुर्द या रस्त्यासाठी २० लक्ष रुपये, रा.मा. -२६८ ते डाऊळ रस्त्यासाठी २० लक्ष रुपये, रा.मा. २४९ ते वंजारवाडी रस्त्यासाठी २० लक्ष रुपये, गुट्टेवाडी फाटा ते देऊळवाडी रस्त्यासाठी २५ लक्ष रुपये, चोंडी ते दापका रस्त्यासाठी २५ लक्ष रुपये तर जळकोट तालुक्यातील चिंचोली ते मेवापूर रस्त्यासाठी ३० लक्ष रुपये, धामणगाव ते डोणगाव रस्त्यासाठी २० लक्ष रुपये, पाटोदा बु. ते शिवाजीनगर तांडा रस्त्यासाठी २५ लक्ष रुपये, कुणकी ते वांजरवाडा रस्त्यासाठी १५ लक्ष रु. असे उदगीर व जळकोट मतदार संघातील एकुण ९ रस्त्याच्या नविन कामासाठी ना.संजय बनसोडे यांनी २ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असुन लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.सदर रस्ते झाल्याने या भागातील नागरिकांची अडचण दूर होणार आहे. म्हणून नागरिकांनी समाधान व्यक्त करून नामदार संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

ग्रामीण भागातील रस्त्यासाठी 2 कोटींचा निधी मंजूर ना. संजय बनसोडे

ग्रामीण भागातील रस्त्यासाठी २ कोटींचा निधी मंजूर ना. संजय बनसोडे

नाबार्ड अंतर्गंत उदगीर तालुक्यातील रस्त्यासाठी ३ कोटी ५० लक्ष रुपयाचा निधी मंजुर – संजय बनसोडे

About The Author