भीमा कोरेगाव शौर्यदिना निमित्त विजयस्तंभ येथे 500 शूरवीरांना मानवंदना
पुणे (प्रतिनिधी) : 1972 दलित पॅंथर संस्थापक पद्मश्री नामदेव दादा ढसाळ राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले साहेब दलित पॅंथर संघटनेच्या माध्यमातून दि. १ जानेवारी २०२४ रोजी दलित पॅंथर पुणे शहराच्या वतीने १ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्यदिन निमित्त विजयस्तंभ येथे 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी पुणे स्टेशन येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे ते भीमा कोरेगाव बहुजन एकता बाईक रॅली युवा नेते दलित पॅंथरचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा,अर्जून शिंगे यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन रॅली काढण्यात आली तसेच भीमा कोरेगाव येथे 500 बिसलेरी पाणी बॉटल व अन्नदान मोफत भीमसैनिकांना वाटप करण्यात आला व विविध उपक्रम च्या माध्यमातून ५०० शूरवीरांना अभिवादन केले.
त्यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार आदरणीय रवींद्र भाऊ धंगेकर व जस्ट नेते मा,आमदार आदरणीय मोहन दादा जोशी तसेच दलित पॅंथरचे पुणे जिल्हा सचिव महिला आघाडी सौ समीना शेख व दलित पॅंथर पुणे शहर युवा अध्यक्ष मा कैफ शेख व हडपसर विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब पवळे व कात्रज विभाग अध्यक्ष विजय भाऊ चव्हाण व शरणाप्पा तूपसाखरे दलित पॅंथरचे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होते.