नववे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन अहमदपूरात संमेलन अध्यक्षपदी एड. उषा दराडे यांची निवड

0
ननवे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन अहमदपूरात संमेलन अध्यक्षपदी एड. उषा दराडे यांची निवड

ननवे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन अहमदपूरात संमेलन अध्यक्षपदी एड. उषा दराडे यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : जानेवारी महिन्यात नवव्या लेखिका साहित्य संमेलनाची अहमदपूरकरांना चांगलीच मेजवानी मिळणार असून या साहित्य संमेलनात कथाकथन, परीसंवाद , निमंत्रित कवयित्रींचे कवी संमेलन होणार असून मराठवाड्यातील नामवंत लेखिका साहित्यिक यात सहभागी असल्यामुळे अहमदपूर परिसरातील साहित्य रसिकांना चांगलीच मेजवानी मिळणार आहे. यामुळे तालुका आणि परिसरात आनंदाची लहर पसरलेली आहे. दि.20 आणि 21 जानेवारीला होणाऱ्या या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बीड येथील सुप्रसिद्ध लेखिका उषाताई दराडे यांची निवड झाली असून संमेलनाचे उद्घाटक म्हणून जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे या उपस्थित राहणार आहेत. कॉ. श्रीनिवास काळे स्मृती प्रतिष्ठान व मसाप शाखा अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या नवव्या लेखिका साहित्य संमेलनाचे आयोजन येथील संत जनाबाई साहित्यनगरी संस्कृती सभागृहामध्ये होणार आहे.

साहित्याचा मोठा वारसा असलेल्या अहमदपूर तालुक्यात मराठी साहित्याची आवड व जाण असलेली रसिक मंडळी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. दोन दिवशीय या लेखिका साहित्य संमेलना च्या पहिल्या दिवशी 20 जानेवारी रोजी सकाळी ग्रंथ दिंडी निघणार असून याची सुरुवात सुप्रसिद्ध लेखिका ललिता गादगे यांच्या हस्ते होणार आहे, तर सकाळी दहा वाजता उद्घघाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या मुख्यमंचावर लेखिका प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी व्यासपीठावर लेखिका साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा प्राचार्य डॉक्टर दीपाताई शिरसागर, म सा प चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, मसापचे अहमदपूर शाखेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे, कार्यवाह हरिदास तंम्मेवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. दु. बारा ते दोन या वेळात पहिल्या परिसंवादात मराठी कादंबरी आणि मराठवाड्यातील स्त्री कादंबरी लेखन या विषयावर परिसंवाद होणार असून अध्यक्षपदी परभणीच्या प्रा. डॉ सावित्रा चिताडे या राहणार असून यात सहभाग लातूरच्या डॉ. जयदेवी पवार, देगलूरच्या संजीवनी नेरकर, गंगापूरच्या द्रौपदी पंदीलवाड, नांदेडच्या दीपा बियाणी, गुंजोटी आशिया चिस्ती, लासुर स्टेशनच्या शारदा देशमुख यांचा समावेश आहे. दुपारी दोन ते तीन या वेळात कथाकथन असून अध्यक्षपदी सरोजा देशपांडे( परभणी) या राहणार असून सहभाग अनिता येलमटे उदगीर, रत्नमाला मोहिते जालना, पुष्पा दाभाडे-नलावडे कन्नड, प्रा सुनीता गुंजाळ धाराशिव, अनुपमा बन नांदेड, डॉ. सत्यशीला तौर जालना यांचा समावेश आहे. सायंकाळच्या थंड वातावरणात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी डॉ. उर्मिला चाकूरकर( पैठण) या आहेत तर संजीवनी तडेगावकर, तृप्ती अंधारे ,कल्याणी राणी देशमुख, कविता बोरगावकर ,माधवी चव्हाण, शैलजा कारंडे ,वैशाली पाटील, विमल मुदाळे, गौरी देशमुख, चंद्रमुखी बोळेगावे, वर्षा माळी, मीना तोवर ,नीता मोरे , यांच्या सह जवळपास 50 नामांकित कवयित्रीचा सहभाग आहे. दुसऱ्या दिवशी 21 जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत विद्यमान तंत्रज्ञान आणि माध्यमातील स्त्री प्रतिमा या विषयावर

परिसंवाद होणार असून याच्या अध्यक्षपदी प्रा समिता जाधव छत्रपती संभाजीनगर ह्या आहेत तर सहभाग विद्या बयास, अनुजा डोईफोडे, शर्मिष्ठा भोसले मुंबई ,रेखाताई हाके पाटील, शैलजा बरुरे, वैशाली कोटंबे यांचा सहभाग राहणार आहे. समारोप बारा ते दोन च्या दरम्यान होणार असून संमेलनाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखिका एडवोकेट उषाताई दराडे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट वर्षा देशपांडे या राहणार आहेत. या साहित्य संमेलनाला उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन या नवव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या स्वागतअध्यक्षा तथा श्रीनिवास काळे स्मृती प्रतिष्ठानच्या प्रमुख ॲड ज्योतीताई काळे, उपाध्यक्ष सरोजाताई भोसले, कार्याध्यक्ष तथा रेखाताई हाके पाटील, सहकार्याध्यक्ष तथा मुख्याध्यापक आशाताई रोडगे तत्तापुरे, कोषाध्यक्ष संगीताताई खंडागळे, प्रतिष्ठानच्या प्रमुख विमलताई काळे यांच्या सह संयोजन समितीच्या सदस्यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *