अहमदपूर मध्ये खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या पुढाकारातून श्रीरामाचा दरबार उभारणार
अहमदपूर (गोविंद काळे) : संपूर्ण देशभर 22 जानेवारी 2024 रोजी रामलीला उत्सव साजरा होणार असल्याने लातूर लोकसभा मतदारसंघाचे दानशूर , लोकप्रिय खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या पुढाकारातून अहमदपूर येथे श्रीरामाच्या दरबाराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. अहमदपूर शहरातील थोडगा रोडवरील निजवंते नगर मधील भव्य प्रांगणात श्रीराम, लक्ष्मण, सिता, हनुमान यांच्या भव्य दिव्य अशा प्रतिकृती उभारण्यात येणार असल्याने अहमदपूर सह लातूर जिल्ह्यातील राम भक्तांसाठी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी श्रीरामाचा दरबार भरवून आनंद द्विगुणित केला. आहे. खासदार सुधाकर श्रृंगारे यांचे सुपुत्र शंकर भैय्या श्रृंगारे यांच्या कल्पनेतून दोन एकर जागेत दोन लाख तिस हजार दिव्यांनी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण,सितामाता,हणुमंतरायाचे भव्य दिव्य चित्र उभारण्यात येणार असून, आकर्षक रोषणाई, मोठ्या अनेक स्क्रीन लावण्यात येणार असल्याने प्रत्यक्षात अयोध्या नगरी अहमदपूर शहरात दि.19 जानेवारी च्या मध्यरात्री लोकार्पण होणार असून 20,21,22 जानेवारी 2024 रोजी सर्व रामभक्तानां पाहता येणार आहे. सदरील श्रीरामाच्या दरबाराचे विधीवत भूमीपूजन खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, माजी आमदार बब्रुवान खंदाडे,माजी सभापती अशोक काका केंद्रे, माजी नगराध्यक्ष भारत चामे, त्रंबक आबा गुट्टे, सेवा निवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर,ज्ञानोबा बडगिरे, धनंजय जोशी,ओम भाऊ पुणे,शंकर निजवंते, हेमंत गुट्टे,हणमंत देवकाते, डॉ. सिद्धार्थ कुमार सुर्यवंशी,माणिक नरवटे, बालाजी गुट्टे, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, शहराध्यक्ष सुशांत गुणाले, ओमकार पुणे,युवा मोर्चाचे अध्यक्ष रामानंद मुंडे, रामनाथ पलमटे,संजय माने, महीला मोर्च्याच्या अध्यक्षा जयश्री केंद्रे, प्रदीप वट्टमवार, परमेश्वर आढाव यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील श्रीरामाच्या दरबाराच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी केले.