समाज मनाच प्रतिबिंब म्हणजेच पत्रकारिता..! जेष्ठ पत्रकार माध्यम सल्लागार राजेंद्र हुंजे यांचे प्रतिपादन
अहमदपूर ( गोविंद काळे ) पत्रकारिता म्हणजे समाजातील घडामोडिचे सुक्ष्म निरिक्षण करुन वास्तव्य, सत्यता मांडणे होय. समाज मनाच प्रतिबिंब म्हणजे पत्रकारिता असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार, मुंबई येथील माध्यम सल्लागार राजेंद्र हुंजे यांनी केले.
ते येथील साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने आयोजित दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार तसेच दर्पण सेवा गौरव आणि जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे हे होते. तर यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर, माजी सभापती अशोकराव केंद्रे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रतापराव पाटील, जेष्ठ नेते गोपिनाथ जोंधळे, माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे, शहरप्रमुख लक्ष्मणराव आलगुले, डॉ. मधुसुदन चेरेकर,सूभाषराव सोनकांबळे,मधुसूदन चेरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना राजेंद्र हुंजे म्हणाले की, आजची पत्रकारिता म्हणजे मोबाईल जर्नालिझम आहे. मोबाईच्या माध्यमातुन आपण मॅसेजव्दारा बातमी प्रसारित करु शकतो. पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत असताना काय वाचतोय, त्यातुन काय घेतोय, हवे ते घेतो आणि नको ते देतो यात पत्रकारिता भरडली जात आहे. लेखनीतुन दुसर्याला गोळी मारण्याचे कार्य करु नये, यामुळे लेखन करणाराही झोपत नाही आणि ज्यावर लेखन झाले आहे तो ही झोपत नाही. अश्या प्रकारची पत्रकारिता करण्यापेक्षा जे वास्तव आहे ते निर्भिडपणे मांडण्याचे धाडस पत्रकारामध्ये असले पाहिजे. आज प्रत्येक पत्रकार आप-आपल्या परिने बातमीच्या माध्यमातुन आपली बाजु मांडत आहे. यासाठी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आजच्या बदलत्या युगामध्ये पत्रकारांनी स्वतःला बदलुन काळाच्या ओघाप्रमाणे माध्यंमाचा वापर करुन पत्रकारिता केली पाहिजे. पत्रकारांनी आपल्या ध्येय, धोरणावर ठाम राहुन निर्भिडपणे आपली बाजु मांडली पाहिजे. कशीही परिस्थीती निर्माण झाली तरी आपली एकतर्फि बाजु मांडणे योग्य नाही. राजकारण्यांचा, प्रशासकिय अधिकार्यांना तुमच इथं चुकत ही सांगण्याची ताकद बाजुला ठेवून त्यांची वाहवा करण्यासाठी पत्रकारिता नाही आहे. पत्रकारिता हा खडतर प्रवास असुन सरधोपटपणे चालणारी पद्धकारिता नाही. हो ला हो म्हणणे आणि राजकीय नेत्यांच्या बाजुने उभे राहुन कार्य करणे ही पत्रकारिता नाही. अश्यांना जाब, प्रश्न विचारण्यांची धमक पत्रकारांत असली पाहिजे. राजकीय पत्रकारिता करुन उपयोग नाही. यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, कृषिवियक अश्या विविधअंगानी पत्रकारिता करणे गरजेचे आहे. पत्रकारांनी चौकस बुद्धीने पत्रकारिता करावी. आपली लेखनी हे शस्त्र आहे या शस्त्राचा उपयोग समाज उत्थानासाठी केला पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी माध्यम सल्लागार राजेंद्र हुंजे यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार तर दर्पण सेवा गौर पुरस्कार म जेष्ठ पत्रकार रामलिंग तत्तापुरे व जेष्ठ पत्रकार रंगनाथ वाघमारे यांना देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या वेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की,पत्रकारीता हे सतीचे वाण असून विकासात्मक पत्रकारीतेची कास धरावी असे अवाहन केले.
प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाक्के पाटील म्हणाले की,समाजातील सर्वच घटकांसाठी पत्रकार झटत असतात अशा पत्रकारांचा सूध्दा सन्मान झाला पाहीजे यासाठी अकादमीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगीतले.
तर अध्यक्षीय समारोप करताना माजी आमदार बब्रुवान खंदाडे म्हणाले की,पत्रकार हे समाजाचे प्रतिबिंब आहे.सुदृढ समाजासाठी पत्रकारांचे योगदान अतुलनीय असून वास्तववादी पत्रकारीता ही चिरकाल टिकते त्यासाठी पत्रकारांनी वास्तवतेची कायम कास धरावी तसेच राज्यात प्रत्येक आमदारांनी खासदारांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून इलेक्ट्रॉनिक बस त्या त्या आगाराला द्यावी असं अवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य संगीत कला अकादमीचे अध्यक्ष डॉ.सिध्दार्थकुमार सुर्यवंशी यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. मारोती बुद्रुक पाटील व प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर यांनी केले. उपस्थितांचे आभार राहुल सुर्यवंशी यांनी मानले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गफारखॉन पठाण,अजय भालेराव, दिलीप भालेराव, विजय कुंठे, प्रशांत जाभाडे, सचिन बानाटे, आकाश सांगवीकर, आकाश पवार, कैलास सोनकांबळे, बालाजी मस्के, शरद कांबळे, विलास चापोलीकर आदिंनी परिश्रम घेतले.
यावेळी अहमदपुर चाकुर तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.