आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट तंत्रनिकेतन रुद्धा ता अहमदपूर च्या वतीने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करून महाविद्यालयांमध्ये उपस्थित कर्मचारी यांनी योगासने करून योग दिन साजरा केला. यावेळी प्राचार्य डॉ. नितीन शिवपुजे यांनी योगाचे महत्व सांगताना आज देशभरात उत्साहाने योग दिवस साजरा करण्यात येतो. प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. आताच्या घडीला संपूर्ण जगावर करोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. करोनापासून वाचण्यासाठी सकारात्मक राहणे आणि इम्यूनिटी वाढवणे गरजेचे आहे. शक्य असलेल्या प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, असे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे, प्रा. लातूरे संतोष, प्रा दहीटनकर सुहास, प्रा पिटाळे कालिदास, प्रा.स्वामी महेश, प्रा.आरती पुणे, प्रा. श्रुती मेनकुदळे, श्री कुलकर्णी व्ही एच, श्री कैलास होनमाणे श्री केंद्रे सतीश आदी कर्मचारी उपस्थित होते.