शिवकुमार हिप्परगे सरपंच सेवा महासंघाच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती
अहमदपूर (गोविंद काळे) : सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य च्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ग्रामपंचायत परचंडा येथील सरपंच शिवकुमार राजेंद्र हिप्परगे यांची अहमदपूर तालुकाध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही संघटना सरपंचाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील एकमेव नोंदणीकृत संघटना आहे. आज पर्यंत राज्य कार्यकारिणी ने शासनस्तरावर विविध मागण्या मंजूर करून घेतल्या हे उल्लेखनीय आहे.ग्रामपंचायत निवडणूक होऊन फक्त चार महिने झाले व या चार महिन्यातच परचंडा गावामध्ये विकासाचा विकासाचा धडाका लावला आहे.डिजिटल शाळा, वैशिष्ट्य पूर्ण ग्रामपंचायत,100% नळ योजना, स्वच्छ परचंडा सुंदर परचंडा (1100)अकराशे झाडे लोकसहभागातून लावली व त्याची संगोपनाचे काम त्यानंतर गावातील स्वच्छता, पेवर ब्लॉक, कोरोना मुक्त गाव ( कोरोना किट, फवारणी, प्रबोधन 100% लसीकरण, तपासणी,) दलित वस्तीतील कामे,चार महिन्यात 6 बोर पाडून पाणीप्रश्न सोडविला व गावातील लोकांचा चांगला संपर्क व त्यांची कामे करण्याचा चंग बांधला आहे तसेच प्रशाशनावरील चांगली पकड या कामाची दखल घेऊन सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
अहमदपूर तालुक्यातील परचंडा ग्रामपंचायत पंचायत येथील सरपंच त्यांच्या कामाचा संघटना वाढीसाठी अनुभव बघता त्यांच्या खांद्यावर तालुकाध्यक्ष जबाबदारी राज्य कार्यकारिणी च्या सल्ल्यानुसार सरपंच सेवा महासंघ संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम अंबादास घोगरे, राज्य संपर्कप्रमुख राहुल मारोतराव उके, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देउन तालुकाध्यक्ष जबाबदारी देण्यात आली . ते आपल्या नियुक्ती चे श्रेय सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राज्याअध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, ज्योती अवघड, राज्य कार्यकारिणी सदस्य सतिश साखरे,अमरावती विभागीय अध्यक्ष कल्याण साबळे, विभागीय कार्याध्यक्ष अयुब खान पठाण, राज्य कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब गिराम सोशल मीडिया प्रमुख भाऊसाहेब कळसकर, सरपंच माझा चे संचालक रामनाथ बोर्हाडे, यांना देत आहे .
त्यांच्या नियुक्ती मुळे सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव व स्वागत होत आहे