द युवा ग्रामीण पत्रकार संघाची प्रादेशिक कार्यकारणी जाहीर.

0
द युवा ग्रामीण पत्रकार संघाची प्रादेशिक कार्यकारणी जाहीर.

लातूर (एल.पी.उगीले): महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी सतत कार्य करणारी संघटना म्हणून द ग्रामीण पत्रकार संघ यांच्याकडे बघितले जाते. दर्पण दिनी आयोजित बैठकीत द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार बाबासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या वाढीसाठी प्रादेशिक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह शहरी भाग आणि विविध विषयावरती अभ्यास असलेले व्यक्तिमत्व आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार रमेश पंडितराव राठोड यांची महाराष्ट्र राज्य सचिव पदी निवड करण्यात आली. अतिशय अभ्यासू आणि कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे उत्तम संघटन कौशल्य आणि आपल्या वृत्तपत्रामध्ये विविध सामाजिक बातम्या लावून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे विष्णू मोहन पोले यांची मराठवाडा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.या निवडीबद्दल द ग्रामीण पत्रकार संघ आणि इतर सर्व स्तरातून मान्यवरांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!