राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांनी आत्मसात करावे – अशा रोडगे यांचे प्रतिपादन

0
राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांनी आत्मसात करावे - अशा रोडगे यांचे प्रतिपादन

राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांनी आत्मसात करावे - अशा रोडगे यांचे प्रतिपादन

वाढवणा (गोविंद काळे) : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक अडचणीवर मात करत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्याचे कार्य राष्ट्रमाता जिजाऊनी केले व सबंध देशाला सर्वधर्म व मानवतावादाचा संदेश स्वामी विवेकानंद यांनी दिला त्यामुळे या दोन महापुरुषांचे विचार युवकांनी आत्मसात करावे असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या आशा रोडगे तत्तापुरे यांनी केले. त्या दि.12 रोजी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रल्हाद जाधव, प्रमुख अतिथी म्हणून राम तत्तापुरे, मुख्याध्यापिका सुनीता फड, पर्यवेक्षक व्ही बी बिराजदार, एम सी व्ही सी विषयाचे प्रमुख प्रा. मनोज माने एम एस हंबीर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख मंगेश सरदार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी राम तत्तापुरे यांनी स्वामी विवेकानंद यांनी तरुण पिढीला एक नवीन मार्ग दिला त्यात स्वतःचा विकास करा, ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी भोगापेक्षा जीवनात त्याग करायला शिका असे सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दोन्हीही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील प्रतीक्षा नाईकवाडे आणि इतर मुलींचे दोन महापुरुषांच्या जीवनावर मनोगत पर प भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सरोजा दुधाटे यांनी सूत्रसंचालन धनश्री नाईक व साक्षी देशमुख यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभागाचे प्रमुख मंगेश सरदार यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवाबोदीन जहागीरदार,अभिजीत डांगे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!