यशवंत विद्यालयाच्या साईप्रसाद जंगवाड व रोहीणी पाटील ची खेलो इंडिया साठी निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रीय कॅडेट तलवारबाजी स्पर्धा गुजरात राज्यातील मेहसाणा येथे पार पडल्या. या स्पर्धेत अहमदपूरच्या यशवंत विद्यालयाचा साईप्रसाद संग्राम जंगवाड या खेळाडूने इप्पी वैयक्तिक प्रकारामध्ये भारतातून प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले रोहिणी देवराव पाटील या खेळाडूने सेबर सांघिक प्रकारात भारतातून तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदक मिळवले. यामुळे या दोघांचीही तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथे होणाऱ्या केंद्र सरकार पुरस्कृत खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी यांनी खेळाडूंना यशवंत विद्यालयातर्फे तलवारबाजी खेळातील साहित्य भेट देऊन त्यांचे कौतुक केले. या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते दत्ता गलाले, विद्यालयाचे मु.अ. गजानन शिंदे, उप मु.अ. राजकुमार घोटे,के.डी. बिराजदार हे उपस्थीत होते. या खेळाडूंच्या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोक सांगवीकर, सचिव डी. बी लोहारे गुरुजी ,सहसचिव प्रा डॉ सुनिता लोहोरे यांच्या सह क्रिडा शिक्षक दिपक हिंगणे, मिरजगावे मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .