राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.
उदगीर (एल.पी.उगीले) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरसांगवी येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व भारतीय ततत्वज्ञान व हिंदु धर्माची पताका सातासमुदरापलीकडे नेणारे नरेंद्र दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले विचार व्यक्त केले. कांहीनी गीते सादर केली तर कांहींनी नृत्य सुद्धा सादर केली. विस विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान केली होती. अशा प्रकारे जयंतीचा कार्यक्रम अतिशय बहारदार झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुरेश गुरमे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मारोती सोनकांबळे,आनंद पांचाळ होते.यावेळी जी.टी.मुंडे,ज्ञानोबा टेकले,दत्ता पवार, सुवर्णमाला नलाबले, पालक, महिला व तरुण उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गंगाधर मुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानोब टेकले यांनी मानले.