लालबहादुरमध्ये स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी
उदगीर(एल.पी.उगीले) भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या लालबहादुरशास्त्री माध्यमिक विद्यालयाच्या वतीने स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ व योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद यांची जयंती कलोपासक मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.याप्रसंगी मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड ,उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी,पर्यवेक्षक कृष्णा मारावार ,लालासाहेब गुळभिले , माधव मठवाले,अभ्यास पुरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार , प्रमुख उपस्थितीमध्ये अनिता मुळखेडे, विजया गोविंदवाड तर राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत स्वरा शिनगारे, मोहिनी धोत्रे तर स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत श्रिया महामुनी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.याप्रसंगी अभिरुप स्वामी विवेकानंदांच्या वेशभूषेत असलेल्या श्रिया महामुनी हिने शिकागो येथील धर्म परिषदेतील प्रसंग आपल्या भाषणातून सांगितला, अभिरुप जिजाऊ वेशभूषेतील स्वरा शिंगाडे हिने स्वराज्य निर्माणाचा इतिहास आपल्या भाषणातून मांडला.यावेळी विद्यार्थीनींनी जीजाऊ वंदना सादर केली. वेशभूषेत आलेल्या नंदिनी मुसळे,गायत्री कळसाईत, विठ्ठल मिरकले यांनी राजमाता जीजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती सांगितली. यावेळी विद्यार्थ्यांनी एक नाटीका सादर केली. प्रमुख मार्गदर्शीका विजया गोविंदवाड यांनी राजमाता जिजाऊ यांच्या विषयी अभ्यासपूर्ण माहिती सांगितली, तर अध्यक्षा अनिता मुळखेडे यांनी तेजस्वी पुरुष स्वामी विवेकानंद यांच्या विषयी महत्वपूर्ण माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषवणारे 8 वी ते 10 वी विभागाचे पर्यवेक्षक कृष्णा मारावार यांनी युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या, व जिजाऊ हिंदवी स्वराज्य निर्माण कार्यावर उजाळा आपल्या भाषणातून टाकला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता जाधव,सृष्टी वट्टमवार व निधी तेलंगे यांनी केले . वैयक्तिक गीत पूजा खरोबे हिने गायले.प्रास्ताविक अस्मिता बिरादार ,अनुष्का गित्ते,स्वागत परिचय ऋतुजा पंदलवाड,सायली देशमुख ,आभार कार्यक्रम प्रमुख रागिणी बर्दापूरकर,प्राजक्ता जोशी यांनी केले.