आजच्या तरुण पिढीने प्रभू श्रीरामचंद्र यांचा आदर्श घेऊन चारित्र्य संपन्न व्हावे – ह.भ.प.प्रकाश महाराज साठे
अहमदपूर (गोविंद काळे) : येथे संस्कृती मंगल कार्यालय येथे 22 जानेवारी 2024 या शुभ दिनी प्रभू श्रीरामललांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त कै.गंगाबाई नामदेवराव हाके पाटील यांच्या स्मरणार्थ गणेशदादा हाके पाटील व झी टॉकीज गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम चरित्र कथा सुरू असून या कथेला भाविक भक्तांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून याप्रसंगी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी तरुणांना निर्व्यसनी चरित्र संपन्न पिढी निर्माण होणे काळाची गरज असून त्यासाठी आयोध्यपती प्रभू श्रीरामचंद्र यांचे जीवन डोळ्यासमोर ठेवून आयुष्य जगावं व आज प्रत्येक कुटुंबाने प्रभू श्रीरामचंद्र यांची कथा ऐकावी पहावी व वाचावी असे आवाहनही केले.
प्रभू श्रीराम चरित्र कथेच्या निमित्ताने अहमदपूर व आजूबाजूतील परिसरातील भाविकांची विशेषता महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली. तसेच प्रभू रामचंद्र यांची दिवा लावून केलेल्या आरतीने परिसर प्रकाशाने उजळून निघाला व सर्व परिसर अयोध्यामय झाल्याचे दिसून आले. तीन दिवस झालेल्या या कथेत प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला, तसेच अयोध्या येथून आलेला पवित्र अक्षता कलश यांचे पूजनही यावेळी करण्यात आलं व अयोध्या ते कार सेवा केलेल्या कार सेवकांचा सत्कारही करण्यात आला. कलश यांचे दर्शन घेण्यासाठी व कथा ऐकण्यासाठी भरपूर नागरिक उपस्थित होते. ही कथा 15 ते 22 जानेवारी झी टॉकीज वरती दाखवण्यात येणार असून ,विशेष म्हणजे यातील भाग 22 जानेवारी रोजी प्रभू रामचंद्र यांच्या स्थापने वेळी दाखवण्यात येणार असल्यामुळे रामभक्तांना या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सहभाग घेता आला. या सोहळ्यास आयोजक भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख माजी आमदार बब्रुवान खंदाडे भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस रेखाताई तरडे भाजपा सरचिटणीस ॲड भारत चामे भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक काका केंद्रे प्रताप पाटील, हनमंत देवकते बाळासाहेब होळकर, दत्तात्रय जमालपुरे, हेमंत गुट्टे,कुलदीप हाके, अड निखिल कासनाळे,जीवन मद्देवाड, गोविंद गिरी, डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, रामानंद मुंडे, दत्ता गोरे, प्रदीप वटमवार संजीव माने ,बजाज रतनलाल, बालाजी बोबडे ,श्रीकांत भुतडा रविशंकर ,माणिक नरवटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.