अहमदपूरातील राज्यस्तरीय रन फॉर युनिटी मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरात राज्यस्तरीय मॅरेथॉन रन फॉर युनिटीचे आयोजन दि १४ जाने रोजी करण्यात आले मॅरेथॉनला राज्यभरातील धावपटूंनी उदंड प्रतिसाद देत सहा वर्षे ते साठ वर्ष वया पर्यंतचे महिला, पुरुष धावपटू मॅरेथॉनमध्ये धावले. मॅरेथॉनचे उद्घाटन लातूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी केले तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी न प चे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे तहसीलदार शिवाजीराव पालेपाड पोलीस निरीक्षक सुधाकर देडे हे उपस्थित होते.
अहमदपूरच्या राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव समिती व नगरपालिका अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनच्या आयोजनामध्ये आयुष्यमान योगा ग्रुपच्या सदस्यांनीही खूप मोठे सहकार्य केले. रन फॉर युनिटी मॅरेथॉन मध्ये पाच किलोमीटर व दहा किलोमीटर धावण्याचा टप्पा होता. महिला गट व पुरुष गट असे दोन विभाग स्वतंत्रपणे करण्यात आले होते मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रभरातून बाराशे धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला मॅरेथॉन मधील विजेत्यांची नावे खालील प्रमाणे असून दहा किलोमीटर पुरुष गट प्रथम क्रमांक मुंजाळ रामेश्वर विजय, द्वितीय क्रमांक कारंजा नितेश राजकुमार, तृतीय क्रमांक सरतापे कृष्णा यांनी मिळवला तर उत्तेजनार्थ चौथा क्रमांक आडे भाऊसाहेब व पाचवा क्रमांक सादिक शेख यांनी पारितोषिक मिळवत पटकावला
पाच किलोमीटर पुरुष गट
प्रथम क्रमांक ढवळे संविधान, द्वितीय क्रमांक एक योगेश पाडूळे, तृतीय क्रमांक समाधान पुकाले ,उत्तेजनार्थ चतुर्थ क्रमांक दत्तात्रय सूर्यवंशी व पाचवा राहुल पैठणे यांनी पटकावले.
महिला गटात पाच किलोमीटर मॅरेथॉन
प्रथम क्रमांक साक्षी जाड्याळ, द्वितीय क्रमांक पुष्पा राठोड, तृतीय क्रमांक हाके प्रांजली
व उत्तेजनार्थ चतुर्थ क्रमांक शिनगारे श्रद्धा , पाचवा क्रमांक सूर्यवंशी सारिका यांनी मिळवला.
दि ( १४ ) जाने रोजी सकाळी सात वाजता महात्मा गांधी कॉलेजच्या मैदानापासून लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात केली
मॅरेथॉनचे एक वैशिष्ट्य म्हणजे “शेतकरी जगला पाहिजे” असे लिहिलेले टी-शर्ट घालून धावलेल्या धावपटूंने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर सहा वर्षाचा मुलाने पाच किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण केले हे एक आकर्षणाचे केंद्र ठरले. एकंदरीतच संपूर्ण अहमदपूरकरच या एकात्मतेच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याचे चित्र दिसत होते. चौका चौकामध्ये फुले उधळून धावपटूचे स्वागत करण्यात आले अहमदपूर मध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले व ती चांगलीच यशस्वी झाली व सर्वांमध्येच एकात्मतेचा भाव निर्माण झाला.
हे मात्र निश्चितच खरे आहे.