नवीन शैक्षणिक वर्षात पाच वर्षानंतर पदवी मिळणार – डॉ विठ्ठल गोरे
उदगीर (एल.पी.उगीले) : नवीन होऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणात पुढील काळात पाच वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवी मिळणार आहे. आत्तापर्यंत तीन वर्षात मिळत असलेली पदवी यापुढे पाच वर्षाच्या अभ्यासक्रमा नंतर मिळणार आहे . या नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती विद्यार्थ्यांनी करून घ्यावी. असे आवाहन हावगीस्वामी महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठल गोरे यांनी केले.
मातृभूमी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद आणि माँ जिजाऊ मासाहेब यांच्या जयंती सप्ताह निमित्त शुक्रवार (ता.१९) मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विठ्ठल गोरे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे शहर अध्यक्ष प्रा. गौरव जेवळीकर , नैतिक मूल्य शिक्षण प्रांत प्रमुख संतोष कुलकर्णी हे होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मनोज गुरुडे हे होते .
पुढे बोलताना डॉ गोरे यांनी सांगितले की, भारतावर अनेकवेळा आक्रमण करण्यात आले . आक्रमनाद्वारे भारतीय संस्कृती मिटविण्याचे प्रयत्न केले गेले . नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठ जाळून टाकण्यात आले . मागील अनेक वर्षापासून मेकालेची शिक्षण पद्धती अस्तित्वात होती, ती आता नवीन शैक्षणिक धोरणात बदलण्यात येत आहे. नवीन बदल विद्यार्थ्यांनी माहीत करून घेणे गरजेचे आहे .
प्रा. गौरव जेवळीकर यांनी माँ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रमाणे विद्यार्थ्यांना जीवनात जो पर्यंत शिस्त लागत नाही, तो पर्यंत तो कोठल्याच क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही, यामुळे यांचा आदर्श कायम डोळ्यापुढे ठेवावा असे सांगितले .
अश्विनी दळवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तर प्रा. रणजित मोरे यांनी आभार मानले . यावेळी प्राचार्य उषा कुलकर्णी , प्रा. सय्यद उस्ताद , प्रा.अश्विनी देशमुख ,प्रा. रेखा रणक्षेत्र, संगम कुलकर्णी , रुपाली कुलकर्णी , पार्वती किणीकर ,शीतल पवार,आकाश राठोड , राहुल जाधव ,उषा सताळकर , नितिश शिरसे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.