खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या हस्ते राम दरबाराचे विधीवत पुजन करून मोठ्या उत्साहात लोकार्पण
अहमदपूर (गोविंद काळे) : संपूर्ण देशभर 22 जानेवारी 2024 रोजी रामलीला उत्सव साजरा होणार असून दिवाळी साजरी होणार असल्याने लातूर लोकसभा मतदारसंघाचे दानशूर तथा लोकप्रिय खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांच्या पुढाकारातून अहमदपूर येथे श्रीरामाच्या दरबाराच्या प्रतिकृतीचे होमहवन करून विधीवत पुजन करून सांयकाळी 7 वा. खासदार सुधाकरराव श्रुगांरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
अहमदपूर शहरातील थोडगा रोडवरील निजवंते नगर मधील भव्य प्रांगणात श्रीराम, लक्ष्मण, सिता, हनुमान यांच्या भव्य दिव्य दोन लाख तिस हजार पणत्यामध्ये प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. सदरील श्रीरामाच्या दरबाराच्या प्रतिकृती उभ्या करुन अहमदपूर सह लातूर जिल्ह्यातील राम भक्तांसाठी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी श्रीरामाचा दरबार भरवून रामभक्तांचा आनंद द्विगुणित केला असून सदरील श्रीरामाच्या दरबाराचे वल्ड रेकार्ड होणार आहे.
खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांचे सुपुत्र शंकर भैय्या श्रृंगारे यांच्या कल्पनेतून दोन एकर जागेत दोन लाख तिस हजार दिव्यांनी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण,सितामाता,हणुमंतरायाचे भव्य दिव्य चित्र उभारण्यात आले असून विद्युत रोषणाई असल्याने प्रत्यक्षात अयोध्या नगरी अहमदपूर शहरात अवतरली आहे.आज दुपारी १२ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत 51 ब्राह्मणांच्या हस्ते विधीवत होमहवन करण्यात आले. महिला व मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर लातूर येथील कलाकारांचा श्रीरामा वरती डान्स झाल्यानंतर फित कापुन लोकार्पण खासदार सुधाकरराव श्रुगांरे यांच्या हस्ते करण्यात आले. मोठ्या प्रमाणात यावेळी अतिशबाजी करण्यात आली .20,21,22 जानेवारी 2024 रोजी सर्व रामभक्तानां श्रीरामाचा दरबार पाहता येणार असून 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पाच हजार फुगे आकाशात सोडले जाणार आहेत. तदनंतर हेलीकॉप्टर द्वारे सदरील श्रीरामाच्या दरबारावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आसल्याचे खासदार सुधाकरराव श्रुगांरे यांनी सांगितले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख,भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा निवडणुक प्रमुख गणेश दादा हाके पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे,भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,माजी सभापती अशोक काका केंद्रे,माजी नगराध्यक्ष भारत चामे,माजी जिल्हा परिषद सदस्य त्रंबक आबा गुट्टे,माजी सभापती सौ. अयोध्याताई केंद्रे, माजी नगराध्यक्ष सौ. अश्विनीताई कासनाळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी,जिल्हा चिटणीस हणमंत देवकते, श्रीकांत देशमुख,धैरर्यशिल देशमुख,डॉ. सिद्धार्थ कुमार सुर्यवंशी,शहराध्यक्ष सुशांत गुणाले, ओमकार पुणे,अमित रेड्डी,निखील कासनाळे,संतोष कोटलवार,पिंठू नाईक यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी खासदार सुधाकरराव श्रुगांरे, जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करुण रामभक्तानां शुभेच्छा दिल्या. सदरील बहारदार दरबाराच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आभार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी मानले