ग्रामविकासात उत्कृष्ट ठरलेल्या बेलूर ग्रामपंचायतीच्या सरपंचाना दिल्ली प्रजासताक सोहळ्याचे निमत्रंण
अहमदपूर (गोविंद काळे) : राज्यातील ग्रामविकासात उत्कृष्ट ठरलेल्या ग्रामपंचायती पैकी एक असलेल्या अहमदपूर तालुक्यातील बेलूर गावच्या सरपंच सौ कमलबाई राजपाल सूर्यवंशी यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने येत्या 26 जानेवारी 20240 ला दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे निमंत्रण केंद्रसरकार तर्फे दिले आहे .
हा बहुमान म्हणजे अहमदपूर तालुक्याचाच बहुमान असून सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या ग्रामपंचायतने उल्लेखनिय कार्य करताना घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडी, ओला कचरा, सुका कचरा डस्ट बीन सर्व शासकिय इमारती, शाळा, गावाचापाणीपुरवठा, ग्रामपंचायत कार्यालय हे सर्व सोलार विजपुरवठ्या वर चालतात प्लॅस्टिक मुक्त गाव पाण्यासाठी वॉटर मिटर, विध्यार्थ्यासाठी अभ्यासिका उन्हाळ्यात गावाला थंड व साधेपाणी दोन्ही आर. ओ द्वारे उपलब्ध वृक्षारोपन, स्वच्छ व सुंदर गाव शंभर टक्के वसूली असे अनेक चांगले काम केले आहेत या कामाची दखल घेत या गावाच्या सरपंच सौ कमलबाई राजपाल सूर्यवंशी व ग्रामसेविका शितल अकणगीरे यांना प्रजासत्ताक सोहळ्यास विषेश आतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. अल्पावधीतच ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना सरपंच सौ. सुर्यवशी य यांनी ग्रामविकासाची कास धरून आपली ग्रामपंचायत राज्यात विकासाचे मॉडेल ठरवले आहे. अश्या राज्यातील 11 ग्रामपंचायत सरपंचांना दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनी सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे .
26 जानेवारी 2024 रोजी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी साजरा होणार आहे याची जोरदार तयारी सुरू असतानाच अहमदपूर तालुक्यातील बेलूर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या बातमीने आनंद व्यक्त केला जात आहे . प्रजासत्ताक दिन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून सरपंचांना स्थान राहणार आहे यासाठी जिल्हा परिषद लातूर मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर,तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी व अहमदपूरचे गटविकास अधिकारी अमोल कुमार अंदेलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बेलूर ग्रामपंचायत ने आर आर आबा सुंदर गाव स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर गावातील विविध विकास कामांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बेलूर गावचे सरपंच व ग्रामसेविका यांचा दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून समावेश करण्यात आला . याबद्दल बेलूर ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.