योग रुपी शस्त्राचा वापर करून कोरोनाला हरवू या – डॉ संदीप जगदाळे

योग रुपी शस्त्राचा वापर करून कोरोनाला हरवू या - डॉ संदीप जगदाळे

दयानंद शिक्षण संस्थेच्या योग शिबीराचा लाभ घेतला अमेरिका व इंग्लंड मधील नागरिकांनी

लातूर (प्रतिनिधी) : आपल्या देशात तब्बल पाच हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या योग विद्येत कोरोनाला हरविण्याची क्षमता आहे. त्यामुळे योग रूपी शस्त्राचा वापर करून आपण सारे मिळून कोरोनाला हरवू या” असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. संदीप जगदाळे यांनी केले ते दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन योग, प्राणायाम व ध्यान शिबिरात बोलत होते. पुढे ते म्हणाले की,” नियमित योगा केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. ताणतणावापासून मुक्ती मिळते, स्मरणशक्ती तल्लख होते, बुद्धिमत्ता तीक्ष्ण होते, मन आनंदी आणि निरामय होते. म्हणून नियमित योग करून आपण आपल्या देशाला कोरोना मुक्त करू या.” यावेळी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड म्हणाले की,”आरोग्यासाठी योग, प्राणायाम आणि ध्यान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या देशाने जगाला बहाल केलेली योग ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. अशा या योगाला भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली.”

कोरोनाचे संकट असले तरी “योगा तो होगा” असे म्हणत या वर्षीही योगा घरात राहूनच साजरा करण्यात आला. दयानंद शिक्षण संस्थेच्या भव्य क्रिकेट लॉनवर या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे थेट प्रक्षेपण दयानंद एज्युकेशन सोसायटीज लातूर या यूट्यूब चैनल वरून प्रक्षेपित करण्यात आले. दयानंद शिक्षण संस्थेतील सर्व पदाधिकारी, सातही महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांनी घरातच राहून हा ऑनलाईन आंतरराष्ट्रीय योग दिवस अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा केला.

या शिबिरात केवळ लातूर शहरातील व्यक्तींनी सहभाग नोंदविला नाही तर अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणाऱ्या सारिका राहुल बेतल, कॅलिफोर्नियात राहणारे विश्वजित बेतल यांनी सहकुटुंब तर इंग्लंड येथील स्कॉटलँड मध्ये राहणारे नितीन कदम यांनी तेथील मित्रांसमवेत सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमात डॉ जगदाळे यांच्या सोबत डॉ. शिवाजी गायकवाड, सौ. जयमाला गायकवाड, योगेश पंडित व कु. सुषमा शिंदे यांनी सहाय्य केले. तर दयानंद शिक्षण संस्थेचे संचालक अजिंक्य सोनवणे यांनी योग मार्गदर्शक डॉ. जगदाळे व विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदजी सोनवणे, ललीतभाई शहा, रमेशकुमार राठी, सरचिटणीस रमेशजी बियाणी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे रासेयो जिल्हा समन्वयक डॉ.संतोष पाटील, क्रीडा संचालक डॉ. अशोक वाघमारे, डॉ. महेश बेंबडे, डॉ. नितेश स्वामी, डॉ. विक्रम चिंते, प्रा.कल्पना टप्पेकर, प्रा.ऋषिकेश मस्के, प्रा. निशिकांत सदाफुले व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व कार्यक्रमाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रा. सचिन पतंगे, श्री. विकास खोगरे, श्री. प्रीतम मुळे यांनी ऑनलाईन प्रेक्षपणासाठी तांत्रिक सहाय्य केले.

About The Author