योगसाधनेतून राष्ट्र व समाज उभारणीचे काम करावे जागतिक योग दिन : माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे प्रतिपादन
लातूर (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद व भारतीय अध्यात्माच्या विचाराने प्रेरीत होऊन राष्ट्र व समाज उभारणीचे काम सुरू केलेले आहे. ते स्वतः योग अभ्यासक असल्यामुळे त्यांनी योगाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून दिलेले आहे. त्यामुळे युनोने भारतीय विद्येला मान्यता दिली. हा भारताचा गौरव आहे. तीच बाब लक्षात घेवून जागतिक योग दिनानिमित्त जगातील 176 देशात योग साधनेचे काम योगगुरू रामदेव बाबा , देवव्रत्तजी आचार्य व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करीत आहेत. त्यामुळे त्याच धर्तीवर तरूण पिढीनेही योग साधनेचे महत्त्व लक्षात घेवून योग साधनेतून राष्ट्र व समाज उभारणीचे काम करावे, असे प्रतिपादन आर्षयोग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते जागतिक योग दिनानिमित्त एमआयडीसी भागातील स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात आयोजित योग प्राणायाम शिबीरात बोलत होते. यावेळी पतंजलि योग समितीचे महाराष्ट्र प्रभारी विष्णुजी भूतडा, महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे संचालक एस.आर.मोरे, जेएसपीएमचे समन्वयक विनोद जाधव, व्यंकटराव सिध्देश्वरे, जग्गनाथ येरोळकर, मिनाश्री दोरवे,प्राचार्य सच्चिदानंद जोशी, प्राचार्य गोविंद शिंदे,एम.एन.एस.बँकेचे कार्यकारी संचालक अमरदीप जाधव, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य मोहन खुरदळे, मु.अ.संजय बिराजदार, इस्टेट मॅनेजर चंद्रशेखर पाटील चाकूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, योगाच्या माध्यमातून आपले आरोग्य अबाधित ठेवण्याबरोबरच वैचारिक व अध्यात्मिक प्रेरणा देण्याचे काम केले जाते. हे काम रामदेव बाबा, स्वामी देवव्रत्तजी आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 40 वर्षापासून सुरू आहे. या माध्यमातून आरोग्याबरोबरच राष्ट्र व समाज उभारणीचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे, त्यामुळे तरूण पिढीने या योग साधनेचे धडे घ्यावेत, असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या जागतिक योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शिबीराचे सुत्र संचलन व आभार अब्दुल गालीब शेख यांनी मानले. यावेळी प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य शैलेश कचरे,प्राचार्य शिरीन मॅडम,आशा जोशी, उपप्राचार्य मारोती सुर्यवंशी, प्राचार्य अरूणा कांदे, मुध्याध्यापिक सुनिता मुचाटे, मु.अ.कोडतीवार यांच्यासह जेएसपीएम परिवारातील सदस्य उपस्थित होते.
योगाला कृतीची जोड द्या…आपले जीवन बदलून जाईल – विष्णुजी भूतडा
प्रत्येकाच्या जीवनामध्ये योगाला अनन्य साधारण महत्त्व आहे. योगाशिवाय निरोगी जीवन नाही. त्यामुळे प्रत्येकांनी दररोज योग करण्याचा संकल्प करा. आपले जीवन परिवर्तीत होईल. योगा हे सर्वात मोठे व्यसन आहे. हे व्यसन ज्यांना लागेल. त्याची इतर सर्व व्यसने सुटून तो पूर्णपणे निर्व्यसनी बनेल अन् योगाच्या एका संकल्पामुळे आपले जीवन पूर्णपणे बदलून जाईल. असा विश्वास पतंजलि योग समिती महाराष्ट्राचे प्रभारी विष्णुजी भूतडा यांनी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित योग शिबीरात बोलून दाखविला. ओंकार व वैदिक मंत्राने सुरू झालेल्या योग शिबीराला लातूरसह राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.