महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उदयगिरी भूषण-23 व शिक्षक गौरव सोहळा संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ‘उदयगिरी भूषण पुरस्कार-2023’ वरिष्ठ महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील प्रा.आर.एम.मुदुडगे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्रा.पी.व्ही.हुडगे, कार्यालय अधीक्षक श्रीमती पी.बी.गायकवाड, शिक्षकेतर कर्मचारी विनोद अष्टुरे या चार कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी आणि सर्व संस्था सदस्य यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. सदरील पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र व पुष्पगुच्छ असे होते. यावेळी मागील शैक्षणिक वर्षात आपल्या विषयात विद्यापीठ आधिसभा निवड, पुस्तक लेखन, राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, साधन व्यक्ती म्हणून कार्य केलेल्या, नवीन पदव्या धारण केलेल्या तसेच विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या 26 प्राध्यापकांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी होते. यावेळी मंचावर उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी व उपाध्यक्ष ॲड.प्रकाश तोडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सदस्य प्रा.मनोहर पटवारी, प्रशांत पेन्सलवार, प्रभारी प्राचार्य डॉ. आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील, उपप्राचार्य एस.जी.कोडचे, पर्यवेक्षक प्रा. जे.आर.कांदे यांची उपस्थिती होती. यावेळी युवा युवा मतदार नोंदणी कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के आणि प्रा.डॉ.बी.एस.होकरणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.पटवारी म्हणाले देशातील परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य शिक्षकात आहे. शिक्षकांनी विज्ञान-तंत्रज्ञान व माणुसकीचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत. ॲड.तोंडारे यांनी संस्थेने हा प्रेरक उपक्रम घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी तिरुके म्हणाले महाविद्यालयाच्या लौकिक वाढवण्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वाटा असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेने हे पुरस्कार जाहीर केले आहेत. अध्यक्षीय समारोपात मानकरी म्हणाले पुरस्काराच्या निमित्ताने महाविद्यालयातील व्यक्तींनी केलेल्या कार्याचा परिचय सर्वांना होतो. आपले कार्य स्मरणात राहील असे सर्वांनी कार्य करावे. शिक्षणातूनच प्रगती, विकास आणि सुसंस्कार मिळतात. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार ग्रंथपाल डॉ.लक्ष्मीकांत पेन्सलवार आणि प्रा.एन.के.खांडेकर यांनी केले. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांनी केले.