अंगणवाडी कर्मचारी कृति समिति , महाराष्ट्र या संघटनेला अखेर आले यश
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : महाराष्ट्र सह अंगणवाडी सेविका यांच्या कार्यास यश आले, तसेच देवणी तालुक्यातील अंगणवाडी सेविका ठाम पणे संप यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान, आज दिनांक २५ जानेवारी २०२४, रोजी अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या नेत्यांची मा . सचिव, महिला बाकविकास अनुपकुमार यादव आणि महिला बाल विकास आयुक्त रुबल अगरवाल व अन्य आधिकाऱ्यासह विस्तृत मीटिंग झाली. १) शासनाने अंगणवाडी ,कर्मचाऱ्यांच्या साठी पेंशन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रीमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल असे सांगितले.तसेच कृति समितीच्या वतीने पेंशन योजने बाबत ठोस सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला.२) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्राच्युईटी देण्याचे मान्य केलें.३) मोबाइल तात्काळ देणार.४) मिनी अंगणवाडी सेविकांना पुर्ण अंगणवाडी सेविका आदेश त्वरित देणार. ५)संपकाळातील कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्याना कामावर घेण्याचे मान्य केले.तसेच सर्व कारवाई आदेश मागे घेणार. असे मान्य केले ६) संप काळ करोना काळातील राहिलेल्या दिवाली व उन्हाळी सुट्टी मध्ये समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार करणार.वरील सर्व चर्चा सचिव आणि आयुक्त यांच्याशी झाली. कृति समितीला ही चर्चा आशा दायक वाटली. त्याचप्रमाणे महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिनांक ५/१२/२०२३ रोजी झालेल्या मीटिंग मधे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्या नंतर त्यांचें अवलोकन करुन अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा विषय मंत्री मंडळात मांडण्यात येईल.वरील परिस्थिती व शासनाच्या सकारात्मक भूमिके �