नायगावला आताच पाणी टंचाईच्या झळा
उदगीर (प्रतिनिधी) : नायगाव येथे आताच तीव्र पाणी टंचाई जानऊ लागली आहे.मागील वर्षी 2023 मध्ये नायगाव परिसरात अगदी कमी पावूस झाला आहे. परिसरात असलेली सर्व छोटी छोटी तळे आताच आटत आले आहेत. नायगाव शेजारील बाजूचे आनंदवाडी,हिप्पळणेर , भुतेकरवाडी येथिल तलाव चक्क तळाला लागले आहेत.या बाबत संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः पहानी केल्यास भीषणता लक्ष्यात येईल.या परिस्थिती मुळे नायगाव येथे पाण्याची मोठी भीषणता निर्माण झाली आहे.कोरडे पडलेले तळे ,विहीर पाहून टंचाई ची सर्वांना जाणीव होईल. परिसरातील विहिरी,काही बोर आताच आटले आहेत.तळ्याच्या बाजूला असलेल्या “शेती विहीर योजने” चे मंजूर विहिरी 50 फूट कोरड्या खणखणीत निघाल्या आहेत.त्यात बाजारात शेती मालास सोयाबीन, ज्वारी,गहू,कांदे या शेती मालाचे भाव पडलेले आहेत.त्यामुळे पिळून निघालेल्या शेतकऱ्यास पाणी टंचाईचे भीषण संकट आता पासूनच नायगाव परिसरात जाणवत आहे. भविष्यात येणाऱ्या पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने तात्काळ उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.