नवनाथ मुरकुटे यांची नेहरू युवा केंद्र लातूर सल्लागार समिती सदस्य म्हणून नियुक्ती
नवनाथ मुरकुटे यांची नेहरू युवा केंद्र लातूर सल्लागार समिती सदस्य म्हणून नियुक्ती
अहमदपूर (गोविंद काळे) : केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागजी ठाकूर यांच्या शिफारशीने नेहरू युवा केंद्र लातूर सल्लागार समिती सदस्य म्हणून लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र नवनाथ मुरकुटे याची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर चाकूर विधानसभा प्रमुख गणेश हाके यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते सांबजी महाजन, हनमंतराव देवकते, बाळासाहेब होळकर,माणिकराव नरवटे इत्यादी उपस्थित होते.
