प्रत्येक क्षणाचा आनंद घेतघेत शिक्षण घेणे आवश्यक आहे – ॲड मानसी हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : आज आपण पाहतोय प्रत्येक शिक्षक अतिशय तळमळीने आपले काम प्रामाणिकपणे करत आहेत प्रत्येक मुल शिकलं पाहिजे, गुणवंत व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्नशील असतात पण विद्यार्थी सुद्धा तेवढ्याच तत्परतेने लक्ष केंद्रित करून अभ्यास करणे गरजेचे असते तसेच शिक्षकांना आपला गुरु मानून त्यांनी सांगितलेले काम वेळेवर करावे म्हणजेच आपण जर त्यांचा सन्मान केला तर नक्कीच यश मिळते त्यासाठी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतघेत शिक्षण घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा ॲड मानसी हाके यांनी केले.
त्या सांगवी (सु) येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या स्वयंशासन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या सचिव तथा भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्राचार्या रेखा हाके,वटसिद्ध नागनाथ आश्रमशाळा वडवळ नागनाथच्या मुख्याध्यापिका मीना देवकते, डॉ स्नेहा हाके, डॉ आशुतोष हाके, इंजि.शुभम हाके, स्वयंशासन दिनाच्या प्राचार्या गायकवाड निकिता,उपप्राचार्या हिवरे वैष्णवी आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना ॲड मानसी हाके म्हणाल्या की, गुणवत्ता ही काही मोठ्या व मोजक्या शहरांची मालकी नाही खरी गुणवत्ता ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येच आहे तेव्हा आपण प्रामाणिक अभ्यास करणे गरजेचे आहे व समोर ध्येय ठेवून ध्येयवेडे होवून अभ्यासात रममाण होणे आवश्यक आहे.यावेळी इंजि शुभम हाके यांनी स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक तयार करून अभ्यास करणे गरजेचे आहे असे म्हटले तर डॉ आशुतोष हाके यांनी प्रथम आपले ध्येय निश्चित करण्याचे आवाहन केले तसेच डॉ स्नेहा हाके यांनी खडतर परिश्रमाचे महत्त्व व्यक्त केले तर मीना देवकते यांनी सृजनशील होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन केले आणि प्राचार्या रेखा तरडे यांनी शिक्षणातून संस्कार होतात असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी विद्यार्थी मधून आजच्या प्राचार्या गायकवाड निकिता, कदम मोक्षदा,गंगणे कोमल यांनीही आपापले मनोगत व्यक्त केले.आज लिपिक म्हणून सय्यद नवाज आणि ढवळे सुमीत यांनी काम पाहिले तर सेवक म्हणून धुळगुंडे उत्तम,हांडे राजेश,कांबळे महेश गायकवाड सिद्धार्थ,शेख समीर यांनी काम पाहिले.तसेच उत्कृष्ट पाठ यामध्ये देमगुंडे गायत्री प्रथम तर पगडे भाग्यश्री द्वितीय आली तसेच उत्कृष्ट टाचण नमुन्यात प्रथम शिरामे सुजाता तर द्वितीय बनसोडे प्राची आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुहानी दुर्गे व पुनम इप्पर यांनी केले तर आभार घाटीवाले शुभांगी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.