मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हा परिषदेच्या प्रांगणावर सकाळी नऊ पंधरा वाजता उपजिल्हाधिकारी श्री प्रवीण फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार शिवाजी पालेपाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, गटविकास अधिकारी अमोल कुमार आंदेलवाड, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी पोलीस विभाग एन सी सी, स्काऊट गाईड यांचे पतसंचलन पाहिले. या सोहळ्यात वीर पत्नी मधुमालती केंद्रे यांचा आणि महसूल क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने यशवंत विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, संत ज्ञानेश्वर विद्यालय, कमला नेहरू विद्यालय, जिल्हा परिषद प्रशाला मुलांची, यशवंत प्राथमिक विद्यालय, रवींद्रनाथ टागोर विद्यालय, नूतन मराठी विद्यालय, केंद्रीय प्राथमिक शाळा आणि विमलाबाई देशमुख कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अदाकारीनी सर्वांची लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी संविधान वाचन आणि सूत्रसंचालन राम तत्तापूरे यांनी तर आभार कपिल बिराजदार यांनी मांनले. सोहळा यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.