वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून २ कोटी रुपयाचा निधी मंजूर – ना. संजय बनसोडे यांची माहिती

0
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून २ कोटी रुपयाचा निधी मंजूर - ना. संजय बनसोडे यांची माहिती

उदगीर (एल.पी.उगीले) : मतदार संघातील वाडी तांड्याचा विकास व्हावा व शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचवुन सर्वसामान्य घटकाचा विकास करण्याचे आश्वासन या भागाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिले होते. या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ना.संजय बनसोडे यांनी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून २ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्यात विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गात अनेक जाती, जमाती असून अद्यापही भटकंती करुन स्थलांतरीत स्वरुपाचे जीवन जगत आहेत. लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी अशा अनेक समूहांचे तांडे / वस्त्या असून अशा तांड्यामध्ये या जाती / जमातीचे लोक अनेक वर्षांपासून राहत असले तरी, अशा तांडे किंवा वस्त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाहीत व त्यामध्ये आधुनिकतेकडे कल असला तरी या प्रवर्गातील बहुसंख्य समाज गरीबीचे जीवन जगत आहे. तांडे, वाडी किंवा वस्त्या यामध्ये सध्या या प्रवर्गातील समाज ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्याच ठिकाणी या समाजास स्थिर जीवन जगता यावे याकरीता त्यांना काही अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने वसंतराव नाईक तांडा वरती सुधार योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णयान्वये वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना
विविध कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असुन यामध्ये जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथील राठोड तांडा येथे रस्ता व नाली बांधकाम करणे, वाघमारी तांडा येथे रस्ता व नाली बांधकाम करणे, वडगाव रेणुका नगर रस्ता व नाली बांधकाम करणे, गुत्ती धर्मा तांडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, सुल्लाळी भवानी नगर तांडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, अतनुर येथील अतनुर तांडा ( रावजी तांडा ) येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, उमरगा रेतु भगवान बाबा नगर
येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, सोनवळा अहिल्यादेवी होळकर नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, धामनगाव अहिल्यादेवी होळकर नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे आदी तर उदगीर तालुक्यातील येणकी धनगर वस्ती येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, नळगीर सेवालाल नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, शिरोळ बार्डर तांडा येथे रस्ता / नाली बांधकाम करणे, देवर्जन अहिल्यादेवी होळकर नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, धडकनाळ जय मल्हार नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, डोंगरशेळकी गावातील डोंगरशेळकी तांडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, हकनकवाडी रुपला तांडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, हेर जायबाची वाडी येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, लोहारा अहिल्यादेवी नगर (नरसिंगवाडी) येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, नागलगाव टिकाराम तांडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, सोमनाथपुर आडोळ तांडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, सोमनाथपुर पिर तांडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, शिरोळ रामघाट तांडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, येणकी धनगर वस्ती रस्ता / नाली बांधकाम करणे, शिरोळ रामघाट तांडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे आदी ठिकणी काम करण्यासाठी २ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
विविध कामांसाठी ना.संजय बनसोडे यांनी निधी मंजूर करुन वाडी तांड्यावर विकास निधी मंजूर केल्याबद्दल या भागातील ग्रामस्थांनी ना.संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *