कॅ.डॉ.अनिता शिंदे करिअर कट्टा द्वारा उत्कृष्ट जिल्हास्तरीय प्राचार्य प्रथम पुरस्काराने सन्मानित
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रज्ञान विभाग,महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा निकाल घोषित करण्यात आला लातूर जिल्ह्यासाठी उत्कृष्ट जिल्हास्तरीय प्राचार्य म्हणून महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्य कॅ.डॉ.अनिता शिंदे यांना उत्कृष्ट जिल्हास्तरीय प्राचार्य प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना करियर व उद्योजकीय प्रशिक्षण देऊन त्यांना मार्गदर्शन करणे, उद्योजकांच्या भेटी, व्याख्याने व मार्गदर्शन करण्याचेही काम करियर कट्टा द्वारे केले जाते.
सदर निवडीचे पत्र यशवंत शितोळे अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्याकडून महाविद्यालयास प्राप्त झाले आहे. निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. किशनराव बेंडकुळे, ॲड विजयकुमार देशमुख, सचिव अॅड. पी. डी. कदम, सहसचिव सुरेशराव देशमुख, सदस्य मधुकरराव देशमुख व मंडळाचे सर्व पदाधिकारी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.पी.बी. बाभुळगावकर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.