अहमदपूरात सकल मुस्लीम समाज बांधवा कडून जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात गुलालाची उधळण, फटाके फोडून पेढे वाटून आणि ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला
अहमदपूर (प्रतिनिधि) : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयऱ्यांच्या शपथपत्राचा आधार घेण्याचा निर्णय घेत राज्यसरकारने अधिसूचना जारी केली. मुंबईला मोर्चा घेऊन निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर शनिवारी सकल मुस्लीम समाज बांधवांच्यावतीने साजीदभाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साजीदभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सकल मुस्लीम समाज बांधवाकडून गुलालाची उधळण, फटाके फोडून पेढे वाटून आणि ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारी रोजी मुंबईला मोर्चा निघाला होता.२६ जानेवारी रोजी हा मोर्चा मुंबईजवळील वाशी येथे होता. लाखोंच्या संख्येने असलेला मराठा समाज मुंबईत आला तर अनेक समस्या निर्माण होतील, ही बाब लक्षात घेऊन राज्यसरकारच्या शिष्टमंडळांनी जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू केली होती. तेव्हा जरांगे पाटील यांनी शनिवारी १२ वाजेपर्यंत निर्णय न घेतल्यास मुंबईला जाण्याचा इशारा दिला होता. रात्रीतून हालचाली झाल्या. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकांनंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेत अधिसूचना जारी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकारी मंत्र्यांसोबत वाशी येथे जाऊन जरांगें पाटील यांना भेटले. तेथे त्यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे जाहिर केले. आणि जरांगे पाटील यांचे उपोषण सोडले.
ही बाब कळताच अहमदपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात साजीदभाई मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी व सकल मुस्लीम समाज बांधवांनी जल्लोष केला. गुलालाची उधळण, फटाके फोडून पेढे वाटून आणि ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला.
या जल्लोषात साजीदभाई मित्र मंडळाचे संस्थाषक अध्यक्ष साजीदभाई सय्यद, जरान पठान, येतीराज केंद्रे,सालेह हबिब चाऊस, इम्रान पठान, सुधिर लामतुरे, सचिन सोमवंशी, सोमेश्वर कदम, अॅड. सुधाकर जगताप, व्यंकट सुर्यवंशी, बालाजी पाटील, उमाकांत
कासनाळे , बालाजी बोबडे, कादरखान लष्करी, मोबीन शेख,नजीब सय्यद, रहेमत्तुला शेख, समीर पठान, अतिक खुरेशी, फारुक शेख, इरफान खुरेशी, जाबेर पठान, मतीन सय्यद,रहिम शेख, गफार मनियार, गौस खुरेशी,सलीम सय्यद, मेहराज सय्यद,समद सय्यद, आसेफ शेख, साबेर काझी, इरफान पठान, जहिर शेख, माजीद बागवान, अमजद खादरी,सन्ना खान,
सिद्दीक तांबोळी, अरकान खुरेशी, अफसर शेख, बकश तांबोळी, सदाम खुरेशी यांच्यासह सकल मुस्लीम समाज बांधव साजीदभाई मित्रमंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.