येलम मित्र परिवारातर्फे महेश येलगटे यांचा सत्कार संपन्न
लातूर (एल.पी.उगीले) : उपजिल्हाधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेतील पात्र ठरलेले महेश श्रीनिवास येलगटे यांचा आणि त्यांच्यावर योग्य संस्कार करणाऱ्या आईवडील यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. हा सत्कार समारंभ यलम मित्र परिवार आणि श्री महेश बचत गट यांनी आयोजित केला होता.सुत्रसंचलन सचिन वलसे यांनी तर प्रास्ताविक श्री मटवाड माधव सर यांनी केले.
माजी आमदार बब्रुवान खंदाडे, ज्ञानोबा बडगीरे, कोल्हे गुरूजी, बिल्लापटे सतिश साहेब, महेश बिल्लापटे , भारत येरमे, बालाजी सारोळे यांच्या शुभ हस्ते चि महेश आणि आईवडील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ज्ञानोबा बडगीरे, महेश बिल्लापटे , खंदाडे साहेब यांनी शुभेच्छारूपी मनोगत व्यक्त करून समाजाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सरपंच बाळासाहेब येरमे, रमाकांत बिल्लापटे, नामदेव येलगटे, चेअरमन सुभाष गुंडरे, दिलीप वलसे, बालाजी वलसे, मोहन वलसे, भागवत येणगे, सुशीलकुमार येणगे, मंगेश कांडणगीरे, भारत येरमे, संतोष सारोळे, विठ्ठल सारोळे, विठ्ठल बिल्लापटे, बालाजी गुंडरे, अमोल सारोळे,अमॄत सारोळे, प्रमेश्वर गुरमे,व्यंकट फुलसे, ज्ञानोबा बिल्लापटे, भागवत येणगे, भारत पेद्दावाड, भागवत वलसे, उमाकांत मंदाडे, रमेश कौरवार यांची उपस्थिती होती . आभार प्रदर्शन भोपे संभाजी यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मटवाड माधव व सचिव महेश बिल्लापटे आणि इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.