मोफत आरोग्य शिबिर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : प्रा.आ.केंद्र देवर्जन अंतर्गत जिल्हा परिषद शाळा तोगरी येथे मुख्यमंञी माझी शाळा व सुंदर शाळा अंतर्गत आरोग्य शिबीर घेण्यात आले. विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.किशोरवयीन मुली तपासणी, मासिक पाळी समुपदेशन व व्यवस्थापन,बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होवु घातलेला लठ्ठपणा व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर माहीती ,मधुमेह व मधुमेहाचे डोळ्यावर होणारे दुष्परिणाम यांची माहिती व प्रतिबंधात्मक उपाय,शाळेत प्रथम उपचार पेटी उपलब्धता माहीती, हात धुवने पध्दत,तंबाखू मुक्त शाळा परिसर माहिती देण्यात आली.
किशोरवयीन मुली ८0 जनांची रक्त तपासणी करण्यात आली.यावेळी डॉ.स्नेहा पाटील, डॉ. प्रशांत नवटक्के, डॉ.अजीत पाटील, श्रीमती मोरे सिस्टर,श्री शेरीकर ,श्रीमती सुजाता उदगीरकर लब टेक्निशियन ,शालेय समिती अध्यक्ष,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.