राष्ट्रीय सेवा योजने चे विशेष युवक शिबिर मौजे मोरतळवाङी येथे आयोजन
उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत, नंदिग्राम कृषि एवंम ग्रामविकास संस्था सुगाव संचलित, कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजने चे विशेष युवक शिबिर शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मौजे मोरतळवाङी ता. उदगीर जि. लातूर येथे घेण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून सरपंच प्रभाकराव पाटील, उद्घाटक म्हणून नं.कि.ए.ग्रा.संस्था,सुगाव चे सचिव गंगाधराव दापकेकर , तंटामुक्ती अध्यक्ष मारुती मोरतळे, वसंतराव पाटील, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य ङाॅ.अंगदराव सूर्यवंशी, ङि.ङी.ओ ङॉ.आनंदराव दापकेकर , डॉ.शिवाजी माने,रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सचिन खंडागळे, कार्यक्रम समन्वयक प्रा. गोविंद हमाने, प्रा. स्नेहा मून, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक रामदास पाटील, विठ्ठल मोरतळे व गणेश पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात हरीत क्रांतीचे प्रनेते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. शिबीराच्या उदघाटन प्रसंगी संस्थेचे सचिव गंगाधररावजी दापकेकर यांनी शिबीरातील विद्यार्थी व गावकरी यांना श्रमदानाचे महत्त्व सांगितले. सदरील शिबीर कालावधी हा दि०५.०२.२०२४ पर्यंत असणार आहे. या मध्ये ग्राम स्वच्छता, रस्ते स्वच्छता, गाजर गवत निर्मुलन, वृक्षारोपन, शोषखड्डे, गटार दुरुस्ती, मंदिर सफ़ाई, मतदान जनजागृती, अंधश्रद्धा निर्मुलन व विविध विषयावरील व्याख्याने इत्यादी उपक्रम राबवण्यात येतील असे सांगितले.
या शिबिरांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मोफत पशुरोग निदान व उपचार शिबिर, शेतीपूरक उद्योजकता विकास व संधी यासारख्या शिबिरा व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांशी संवाद व परिसंवाद म्हणून गांडूळ खत उत्पादन, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ उद्योजकता यासारखे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामसंपर्क, मुक्त विचारपीठ, चर्चासत्र ,सांस्कृतिक पथनाट्य व उद्बोधन पर कार्यक्रम यांचेही आयोजन विद्यार्थी व कृषि महाविद्यालयीन तज्ञांकडून गावातील नागरिकांना व पंचक्रोशीतील नागरिकांना लाभणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी गावातील सर्व सुजान नागरिकांची, प्रगतशील शेतकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचलन व आभार प्रा. सचिन खंङागळे यांनी केले.