नागतिर्थवाडी येथे चिमुकल्यांचा कलाविष्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : नागतिर्थवाडी तालुका देवणी जिल्हा लातूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्नेह संमेलन (कलाविष्कार 2024) कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन महाराष्ट्रातील लोप पावत चाललेली कला भारुड, गवळण, लावणी, गोंधळ, कोळी गीत, लेझिम व टिपरी नृत्य सादर करण्यात आले.
या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धन, लिंग समभाव, प्लास्टिक बंदी सर्वधर्म समभाव,देश भक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी मूल्य अभिनयातून जमलेल्या प्रेक्षकांना समजावून सांगण्यात आले.
गावातील जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी एकनाथ व्यंकटराव पेटे (इंजिनियर पुणे) यांनी 26 जानेवारी निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे विद्यार्थ्याना बक्षीस म्हणून 30 ट्रॉफी साधारणतः 4100 रुपये किमतीचे शाळेला भेट म्हणून दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सहशिक्षिका अमरजा शिरुरे व मु.अ. अश्विनीकुमार गुंजरगे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून गोविंदराव चिलकुरे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती जि.प. लातूर व अध्यक्ष म्हणून शंकरराव पाटील तळेगावकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून अमोल निडवदे जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा लातूर ग्रामीण, प्रशांत पाटील जवळगेकर अध्यक्ष सं.गा.यो. कमिटी देवणी, काशिनाथ आण्णा गरीबे तालुकाध्यक्ष भाजपा देवणी, रामलिंग शेरे तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा देवणी,व्यंकट बोइनवाड माजी गटशिक्षण अधिकारी देवणी, ज्ञानोबा कार्ले केंद्रप्रमुख तळेगाव, ज्ञानेश्वर कोंबडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,राज गुणाले जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा लातूर ग्रामीण, गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. कोमल गुणाले, उपसरपंच नागनाथ गुणाले सर्व ग्रा.प. सदस्य त्याच बरोबर हणमंत बिरादार, राम बिरादार, आबा पाटील, माधव मोरे,इस्माईल शेख, नाना पाटील, गंगाधर गोसावी, तातेराव कांबळे यांच्या सह परिसरात अनेक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास विशेष सहाय्य म्हणून पांडुरंग येलमटे केंद्र प्रमुख वलांडी, ज्ञानोबा रामासने ग्रा.प. सदस्य, योगेश कासले, नरसिंग गिरी, किरण गुर्ले व चंदू बंडगर यांनी सहकार्य केले.