शिवाजी महाविद्यालयात आर्थिक व्यवस्थापनावर कार्यशाळा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयात आयक्युएशी विभागातर्फे ‘महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए एम नवले तर प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक पी. सत्यनारायणा हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे, प्रबंधक बालाजी पाटील यांची होती. यावेळी सत्यनारायणा म्हणाले, गुंतवणूक जशी आहे तसे कर्ज मिळते. त्यासाठी पगार असेल तर सहज सोपे जाते. नियमित पगार असल्यामुळे उत्पन्नाचे नियोजन करता येते. बाहेरचे व्याजदर जास्त असतात, त्यांचा परताव्याचा कालावधी कमी असतो. त्यामुळे आपला सिविल खराब होत असतो. पर्सनल लोन एक दिवसात मिळते. त्यासाठी जास्त कालावधी,जास्त कागदपत्र लागत नाहीत. जमानतदाराची आवश्यकता नाही. तीन लाखापर्यंत आपल्याला लोन मिळते, अशीही माहिती त्यांनी दिली. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य म्हणाले आपल्याला लोन मिळणे सोपे जावेत काही अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी आजची कार्यशाळा ठेवलेली आहे. आपल्याला काही अडचणी असतील तर त्यांच्याशी प्रश्न उत्तरे चर्चा करावी. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या शंका कुशंका विचारल्या. त्याचे निरीक्षण शाखा व्यवस्थापक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विष्णू पवार आयक्वुएसी समन्वयक यांनी तर आभार डॉ. व्ही के भालेराव यांनी मानले.