महिनाभर मोफत सर्वरोगनिदान, औषधोपचार,पंचकर्म व रक्त-लघवी तपासणी तथा अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिर
उदगीर (एल.पी.उगीले) : धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल श्रीकृष्ण मंदिरासमोर देगलूर रोड, उदगीर येथे “हमारा आयुष हमारा स्वास्थ्य” आणि “सर्वांसाठी आरोग्य” या संकल्पनेनुसार तथा आयुर्वेदा फोर वन हेल्थ व हर दिन हर किसी के लिये या मोहिमे अंतर्गत दिनांक 29 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2024 या एक महिन्याच्या कालावधीत दररोज सकाळी ०९.३० ते दुपारी १२.३० या दरम्यान मोफत सर्वरोगनिदान व औषधोपचार पंचकर्म, रक्त-लघवी तपासणी तथा अल्प दरात हर्निया,हायड्रोसील,अपेंडिक्स,मुळव्याधपाइल्स,फिस्टूला,भगंदर यासंबंधीच्या शस्त्रक्रियांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सदरील शिबिरामध्ये संधिवात, आमवात,मणक्याचे आजार-वातविकार, आम्लपित्त,मधुमेह,मुळव्याध,त्वचाविकार,लठ्ठपणा,हर्निया,हायड्रोसिल,नेत्ररोग,दंतरोग,श्वसनविकार,पोटाचे विकार, लहान बालकांचे आजार, श्वेतप्रदर, रक्तप्रदर व स्त्रीयांचे विकार, मासिकपाळी समस्या इत्यादी आजारांच्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार पंचकर्म सुद्धा करण्यात येणार आहे.तरी या मोफत शिबिराचा रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील,डॉ.मंगेश मुंढे,डॉ.राजेंद्र धाटे,डॉ.उषा काळे,डॉ.पुष्पा गवळे,डॉ.रविकांत पाटील,डॉ.अमोल पटणे,डॉ.नामदेव बनसोडे,डॉ.योगेश सुरनर,डॉ.अस्मिता भद्रे,डॉ.रश्मी चिद्रे,डॉ.प्राजक्ता जगताप,डॉ.स्नेहल पाटील,डॉ.दीपिका भद्रे,डॉ.नम्रता कोरे,डॉ.शिवकांता चेटलूरे,डॉ.शिवकुमार होटूलकर,डॉ.शिवकुमार मरतुळे, डॉ.अमोल पाटील,डॉ.विष्णुकांत मुंढे, डॉ.प्राजक्ता कुलकर्णी,डॉ.ओम चिट्टे तसेच धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज,उदगीरचे शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर-रुग्णालयीन कर्मचारी यांनी केले आहे.