मतदार जनजागृती अभियानात नवतरुणांनी सहभागी व्हावे – प्रविण फुलारी यांचे प्रतिपादन

0
मतदार जनजागृती अभियानात नवतरुणांनी सहभागी व्हावे - प्रविण फुलारी यांचे प्रतिपादन

मतदार जनजागृती अभियानात नवतरुणांनी सहभागी व्हावे - प्रविण फुलारी यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : भविष्यकाळात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभे च्या मतदानसाठी ज्यांची वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत. अशा नवतरुणांनी मतदार जनजागृती अभियानात सहभागी होऊन आपली नावे नोंदणी करावे असे आग्रही प्रतिपादन उपजिल्हाधिकारी श्री प्रवीण फुलारी यांनी केले. ते दि.29 रोजी यशवंत विद्यालयाच्या सभागृहात महसूल विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार शिवाजी पालेपाड, नायब तहसीलदार मुनवर मुजावर, ओम शांती केंद्राच्या प्रमुख छाया बहिण जी ,प्राचार्य जी.आर शिंदे, उपप्राचार्य सय्यद एम.यू., उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेद्देवाड, राम ततापुरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तहसीलदार शिवाजी पालेपाड यांनी अध्यक्षीय समारोप केला. उपस्थितीत तरुणांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. प्रास्तविक गौरव चवंडा यांनी सूत्रसंचालन डाँ शरद करकनाळे यांनी केले आणि आभार पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीकरण्यासाठी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते महादेव खळुरे, तलाठी महेश गुपीले, तलाठी प्रशांत बिराजदार यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *