लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत श्रीमती निताताई वट्टमवार यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न.
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेतील उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय सहशिक्षिका निताताई भगवान वट्टमवार यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीनिमित्त सेवा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम शाळेतील मुलींनी निताताईंचे औक्षण केले व पुष्प वर्षाव करत, ढोल ताशांच्या निनादात व्यासपीठावर आणण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे तर, प्रमुख अतिथी म्हणून भा.शि.प्र. संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शंकरराव लासुणे,स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकर वट्टमवार उपस्थित होते,तसेच विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते संतोष कुलकर्णी,बालवाडी अध्यक्षा सौ.अंजलीताई नळगीरकर, डॉ.संजय कुलकर्णी,शालेय समिती सदस्य डॉ.प्रकाश येरमे,अर्थ समिती अध्यक्ष गजानन जगळपूरे, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, सत्कारमूर्ती श्रीमती निताताई वट्टमवार व त्यांचे आईवडील,बालवाडी प्रमुख सौ.छाया कुलकर्णी,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.श्रीमती निताताई वट्टमवार यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.सर्व मान्यवर पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. निताताई वट्टमवार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच,लालबहादुर शास्त्री शिक्षकांची पतसंस्थेच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मूर्ती,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पदाधिकारी अतुल गुरमे, श्याम गौंडगावे व अर्चना सुवर्णकार यांनी गौरव केला.
एकाच शाळेत ३० वर्ष सेवा देऊन विद्यार्थीप्रिय झालेल्या निताताईंना सेवापूर्तीनिमित्त त्यांच्याविषयी भा.शि.प्र.संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शंकरराव लासुणे,स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकर वट्टमवार,संतोष कुलकर्णी यांनी त्यांच्या सेवाकाळात विविध उपक्रम राबवून,शाळेने दिलेली जबाबदारी चोखपणे बजावत शाळेचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न केले असे सांगितले.निताताईचे वडील भगवान वट्टमवार, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी व माधव केंद्रे यांनी भावूक मनाने मनोगत व्यक्त केले.त्यांच्या सेवाकाळातील आठवणी सांगितल्या व सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. निताताई वट्टमवार यांनी त्यांच्या सेवा काळातील अनुभव व आठवणी सांगितल्या.सर्व शिक्षकांनी वेळोवेळी सहकार्य केले.भावूक मनाने सेवाकाळातील आठवणी सांगितल्या.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी निताताई यांनी वक्तशीर राहून,विविध उपक्रम राबवत,सहकार्य वृत्तीने आपली सलग ३० वर्ष सेवा दिलेली आहे.आज त्यांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती होत आहे.त्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी केले.स्वागत व परिचय श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी तर सुत्रसंचलन सौ.अर्चना सुवर्णकार यांनी केले.वैयक्तिक पद्य सुरेखा कुलकर्णी यांनी गाईले.आभार सौ.सविता बोंडगे यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता सौ.भाग्यश्री स्वामीबाईंच्या शांतीमंत्राने झाली.