मुरुड येथे नमो चषक स्पर्धेचा आ.कराड यांच्या हस्ते शुभारंभ होणार
मुरुड येथे नमो चषक स्पर्धेचा आ.कराड यांच्या हस्ते शुभारंभ होणार
लातूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक २०२४ च्या माध्यमातून आयोजित लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते १ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी सायं ५ वाजता मुरुड येथे होणार आहे तेव्हा मतदार संघातील भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह, खेळाडू आणि क्रीडा प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नमो चषक २०२४ सर्वत्र मोठ्या प्रमाणात होत असून या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यमातून तरुणात उत्साहाचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील रेणापूर आणि लातूर दोन तालुक्यात विविध क्रीडा स्पर्धांचे मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे. फायनल स्पर्धा विधानसभा मतदारसंघाची होणार आहे. त्यानुसार लातूर तालुक्यातील मुरुड येथे क्रिकेट हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी स्पर्धा होणार आहेत तर रेणापूर तालुक्यातील रेणापूर येथे क्रिकेट आणि कुस्तीस्पर्धा, खो-खो आणि हॉलीबॉल खरोळा तर कॅरमची स्पर्धा पोहरेगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या सर्व स्पर्धांचा शुभारंभ १ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी सायंकाळी ५ वाजता मुरुड येथील सार्वजनिक स्टेज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजयुमोचे प्रदेश सचिव ऋषिकेशदादा कराड, जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नमो चषक २०२४ स्पर्धेच्या शुभारंभ कार्यक्रमास लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या विविध आघाडी मोर्चासह सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर खेळाडू आणि क्रीडा प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
