आमदार रोहित पवार यांच्या चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीकडून तीव्र विरोध

0
आमदार रोहित पवार यांच्या चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीकडून तीव्र विरोध

आमदार रोहित पवार यांच्या चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीकडून तीव्र विरोध

लातूर (एल.पी.उगीले) : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व महविकस आघाडीच्या लातूर येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन निषेध केला आहे. गांधी चौक परिसरात सुमारे दोन तास ठिय्या मांडून या चौकशी प्रकरणी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत लढत आहेत, आणि त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे आ. रोहित पवार हे आहे. ते आपले आजोबा शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी फुटीर गटाच्या विरोधात राज्यभरात रान पेटवले आहे, राज्यातील सामान्य नागरीक, विद्यार्थी, युवा, शेतकरी, महिला यांच्या मुद्द्यांवरही ते सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत. केवळ आपल्या मतदारसंघा पुरतेच मुद्दे ते मांडत नाहीत, तर राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत आहेत. आमदार म्हणून विधानसभेत आणि रस्त्यावरची लढाईही आ. रोहित पवार हे लढत असल्याचे दिसते. राज्यातील युवांच्या प्रश्नावर नुकतीच त्यांनी पुणे ते नागपूर अशी तब्बल ८०० कि.मी. हून अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचे लक्ष वेधलेच, सोबतच शेतकरी, महिला, कामगार, बेरोजगार यांचे मुद्देही आक्रमकपणे मांडले. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला तर त्यांचा आक्रमकपणा आणि त्यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद संपूर्ण राज्याला बघायला मिळाला.
पक्षातील पहिल्या फळीतील अनेक नेते सत्तेत सहभागी झाले असले तरी आ. रोहित पवार हे न डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची भूमिका ठामपणे आणि मुद्देसूदपणे मांडत आहेत. यामुळेच घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लावला आहे. यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बडगा उगारून पाहिला पण आमदार रोहित पवार यांनी या कारवाईला जुमानले नाही. त्यानंतर युवा संघर्ष यात्रा काढून राज्यभर सरकारविरोधात वातावरण निर्मिती केली. त्यामुळेच लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या या युवा नेत्याला रोखण्या साठी सरकारकडून सूडाची कारवाई केली जात आहे. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लावल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्याविरोधात कारवाई केली जात असेल आणि त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर, ते धोकादायक आहे.
आज आ. रोहित पवार यांची चौकशी ज्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकारणावरून केली जात आहे, त्या राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळांची यादी पाहीली तर त्यापैकी अनेकजण आज भाजपमध्ये किंवा अजित पवार गटामध्ये किंवा शिंदे गटामध्ये आहेत. त्यात स्वतः अजित पवार यांच्यासह अमरसिंह पंडीत, सुनील फुंदे, नितीन पाटील, माणिकराव कोकाटे, रामप्रसाद बोर्डीकर, शेखर निकम, विजयसिंह मोहिते पाटील, राजन तेली, दिलीपराव सोपल, आनंदराव अडसूळ, धनंजय दलाल यांचा समावेश आहे. शिवाय या बरखास्त संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल असून यामध्ये रोहित पवार यांचा काहीही संबंध नाही. परंतु या सर्वांभोवती सत्तेचे कवच असल्याने त्यांची कोणतीही चौकशी केली जात नाही, परंतु आ. रोहित पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांची मात्र चौकशी केली जात आहे. ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ देण्याचा हा प्रकार आहे. तसेच नाबार्डचा अहवाल आणि उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेनुसार दाखल झालेला गुन्हा हा २०१० चा असून आ. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने कन्नड येथील साखर कारखाना हा २०१२ साली लिलावामध्ये ५०.२० कोटी इतकी सर्वाधिक बोली लावून खरेदी केलेला आहे. त्यामुळे राज्य बँकेकडून बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात आ. रोहित पवार यांचा दुरान्वयेही संबंध नाही. शिवाय २०१९ मध्ये ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात कोणताही बेकायदेशीर व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे हा तपासही बंद करण्यात आला आहे. परंतु केवळ त्रास देण्याच्या हेतूनेच या सरकारकडून आ. रोहित पवार यांची चौकशी करत असून लोकांचे प्रश्न विचारणाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे. याविरोधातच हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमकपणे सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध केला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरजिल्हाध्यक्ष राजा मणियार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुनील बसपुरे व शहर प्रमुख विष्णुपंत साठे हे उपस्थित होते . तसेच या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय शेटे, विधानसभा अध्यक्ष ऍड. शेखर हवीले,प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रा. प्रशांत घार, अल्पसंख्यांक प्रदेशमहासाचिव इरफान शेख, अल्पसंख्यांक प्रदेश सचिव फेरोज सय्यद, शहर उपाध्यक्ष बसवेश्वर रेकुडगे,युवक शहर जिल्हाअध्यक्ष समीर शेख,अल्पसंख्यांक अध्यक्ष ॲड. आर. झेड. हाश्मी,युवासेना अध्यक्ष ॲड. राहुल मतोळकर, सोशल मीडिया फ्रंट शहर जिल्हाध्यक्ष अजहर शेख,महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती रेखाताई कदम, महिला आघाडी शहर जिल्हाध्यक्ष श्रीमती मनिशाताई कोकने,युवती जिल्हाध्यक्ष स्नेहाताई मोटे ,शहर सरचिटणीस फिरोज खान, असदमामु, शहर उपसचिव राहुल ढाले,लीगल सेलचे शहर जिल्हाध्यक्ष ऍड. राजकुमार गंडले,कार्याध्यक्ष ऍड. हसन शेख, वैद्यकीय सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अश्रेश्वर शितोळे,राष्ट्रवादी विद्यार्थि आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष तुषार मुचवाड, भटके विमुक्त सेलचे शहर जिल्हाध्यक्ष रोहित चौहान, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष रघुनाथ मदने, माजी नगर सेवक श्रीमती अनुसया सुदावडे, माजी नगरसेवक श्रीमती सुमन गायकवाड, महिला आघाडी शहर कार्याध्यक्ष चंद्रलेखा गुंडरे, डि उमाकांत, प्रवीण साळुंके, विशाल देवकते, अब्दुल शेख, इब्राहिम शेख, बरकत शेख, तौसिफ शेख, जमील नाना, शकील शेख, जकिर शेख, सिराज सय्यद, खंडू लोंढे , अबा सूर्यवंशी, शाहरुख पठाण, आनंद विरेकर,आदर्श उपाध्याय, सलीम घंटे, इरंना पावले, मतीन शेख , तसेच शिवसेनेच्या वतीने
सि. के. मुरळीकर जिल्हा सहसन्वयक, श्रद्धा जवळगेकर युवती सेना जिल्हाप्रमुख, माधव कलमुकले, महानगर संघटक एस. आर चव्हाण विधानसभाप्रमुख विष्णु कांबळे, राजु कतारे, राजु घटमल,शहर सनम्व्यक शंकर रांजनकर, साधु मोरे, हनुमंत पडवळ, तानाजी करपुरे, त्रिंबक स्वामी, सोमनाथ स्वामी, ऍड. प्रवीण मगर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व सामान्य नागरीक सहभागी झाले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *