राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदपूर (शरद पवार) यांचे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन
अहमदपूर (गोविंद काळे) : राजकीय आकसपोटी सध्या देशात केंद्र सरकारकडून इडी , सि बिआई इत्यादी यंत्रणेचा वापर केला जात असून देशातील प्रमुख समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचे या सरकारकडून सातत्याने होत असल्याचे सांगत अहमदपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे विनायकराव पाटील ( माजी राज्यमंत्री) यांच्या नेतृत्वाखाली आज अहमदपूरचे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यात प्रामुख्याने शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांच्यावर झालेली ईडी चौकशी रद्द करण्यात यावी तसेच आज राज्यात युवा विद्यार्थी शेतकरी बेरोजगारी बरोबरचं महिलांच्या सुरक्षा कामगार अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकाचे धोरण उदासिन दिसून येत असुन कापूस, सोयाबीन , कांदा , तूर या शेतमालाला भाव नसून अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे पिकांचे अतोनात नुकसान होऊनही विम्याची नुकसान भरपाई मिळत नाही नोकर भरतीसाठी प्रत्येकी हजार रुपये परीक्षा शुल्क आकारूनही सतत ची होत असलेली पेपर फुटी ही बाब सरकारच्या अंगवळणी पडल्याचे दिसुन येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यावर आणि बेरोजगारावर अन्याय होत आहेत राज्यात नवीन कोणताही प्रकल्प आणून युवकांसाठी रोजगार निर्मिती केली जात नसून महाराष्ट्राच्या वाट्याचे हक्काचे प्रकल्प व इतर राज्यात आणि त्यातही प्रामुख्याने गुजरात मध्ये नेले जात आहेत त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे अनेक वेळा विविध संघटनेमार्फत राज्यांमध्ये ठिकठिकाणी आंदोलन उभारली जात आहेत अनेक दिवस कडाकाच्या थंडीत आंदोलन करूनही अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या आंदोलनाकडे सरकार ढुंकूनही बघत नाही दरवर्षी लाखो युवा शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही असे या निवेदनाच्या माध्यमातून कळविले आहे युवा हा आपल्या देशाचा कणा व भविष्य आहे एकूण लोकसंख्येमध्ये त्याचं प्रमाण 60 टक्के आहे तरीही त्यांच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नसून उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने राज्यातील युवा वर्ग अस्वस्थ आहे राज्यात 32 लाख युवा स्पर्धा परीक्षा ची तयारी करत असून परीक्षा फी पेपर फुटी रखडलेली अडीच लाख रिक्त पदांची भरती हे प्रश्नही सुटलेले नाहीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा खर्च सरकारकडून दरवर्षी कमी केला जातोय गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांच्या ताटात भाकर देण्याचे काम देशाचा पोशिंदा असलेला बळीराजा करतोय मात्र त्याच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येत आहे देशातील सध्याची परिस्थिती पाहता निवेदनात नमूद केलेले सर्व मुद्दे हे अत्यंत महत्त्वाचे असून सर्व समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अहमदपूर – चाकूर चे भावी उमेदवार तथा माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, सय्यद साजिद भाई , तालुकाध्यक्ष रामभाऊ बेल्लांळे आर डी शेळके सुरेंद्र पाटील शहराध्यक्ष जरान खान पठाण, नीलकंठ पाटील , समीर पठाण , बंडू शृंगारे, हनुमंत नाईक , राम बोडके केदार कडवादे व्यंकटराव कर्ले युवक अध्यक्ष सुधीर गोरटे, राजीव खंदाडे , दीपक हालसे, राजू बोडके , कमलाकर शेकापुरे, , रामभाऊ नरवटे , शिवराज पाटील रुपेश शेळके प्रदीप खोमणे ,व्यंकट पाटील , राहुल शिवपुजे , शिवानंद भोसले देविदास सुरनर , उत्तम घोटे यतीराज केंद्रे , उमेद पठाण शकील तांबोळी राजू कदम,अकबर पठाण ,पांडुरंग कांबळे रतन पाटील, केरबा कांबळे संग्राम पवार मनोज रेड्डी संजय गुणाले संतोष कल्याने, विजय पाटील सुधाकर जगताप बबन नवटक्के अन्वर पठाण माधव शेळके मुन्ना पठाण मोतीराम जायभाये हनुमंत नाईक तुकाराम देवकते इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.