यशवंत ज्यु. कॉलेज येथे निरोप समारंभ व स्नेहसमेंलन संपन्‍न       

0
यशवंत ज्यु. कॉलेज येथे निरोप समारंभ व स्नेहसमेंलन संपन्‍न       

यशवंत ज्यु. कॉलेज येथे निरोप समारंभ व स्नेहसमेंलन संपन्‍न       

भ्रष्ट्राचारावर आधारित नाटक, विविधतेमध्ये एकता मुकअभिनय आणि मेंटलजिम संकल्पनेने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध                                                                                            
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत ज्यु. कॉलेज येथे 12 वी च्या मुलांचा निरोप समारंभ तसेच वार्षिक स्नेह समेंलन संपन्‍न झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील यशवंत ज्यु. कॉलेज येथे 12 वी च्या मुलांचा निरोप समारंभ तसेच वार्षिक स्नेह समेंलन संपन्‍न झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजाजन शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य डॉ. दिलीप मुगळे, उपप्राचार्य प्रा. सय्यद एम. यू., सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. रवि इरफ ळे आदिंची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. मुगळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुप्‍त कला गुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसमेंलनासारखे कार्यक्रम होणे गरजे आहे. तसचे त्यांनी नविन शैक्षणिक धोरणावर माहिती मुलांना सांगितले. यावेळी बोलताना उपप्राचार्य प्रा. सय्यद एम. यू. म्हणाले की, यशवंतची 100 निकालाची परंपरा असुन या वर्षीही 12 वी चा 100 टक्के निकाल लागेल यात काही शंका नाही. परीक्षे संबंधी सविस्तर अशी माहितीही विद्यार्थ्यांना देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना प्रा. इरफळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे तसेच स्वतःवर विश्‍वास ठेवून जीवन जगले पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले. निरोप समारंभाच्या कार्यक्रमात दिव्या सुरनर, मुस्तापुरे प्रतिक्षा, होळकर सृष्टी, बुगनर शितल, मुसने अंजली, सृष्टी चाटे, आरती मंडले आदींनी मनोगत व्यक्‍त केले. निरोप समारंभ कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर यांनी केले. वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवात एक दंताय, वक्रतुंडाय  या श्रीगणेशाच्या आराधनेनी पाचंगे ओम संजय यांनी गीत गाऊन झाली. तर चौधरी स्नेहा उत्तम  यांनी आशीक आवारा या गीतावर अप्रतिम नृत्य करुन प्रेक्षकांच्य ह्दयाचा ठेका चुकवला तर काबलिया रोहीणी यांनी तु है तो मुझे फिर और क्या चाहिए या गीतानी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या वार्षिक स्नेह संमेलनाचे आकर्षण म्हणजे भारतामध्ये विविधतेमध्ये एकता दर्शविणारा मुक अभिनय होता. यामध्ये कासले पुनम , आरती रड्डेवाड, सावंत वैष्णवी, समृद्धि कांबळे, सुरनर ईश्वरी आदींनी अभिनय करुन राष्ट्रीय एकात्मचेही ज्योत श्रोत्यांच्या मनामध्ये जागवली.
 कांबळे ऋतुजा प्रदिप यांनी हिर्‍याची अंगठी या लावणीवर पारंपारिक नृत्य करत उपस्थितांना मदहोश केले. तर होळकर सृष्टि शंकरराव यांनी ओ देश मेरे हे गीत गाऊन प्रेक्षकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्‍ति निर्माण केली. तर पायल महादेव बनसोडे यांनी चंद्रा (डान्स) गीतावर नृत्य करत सर्वांना आनंदित केले. तर  मंडले आरती जगदीश यांनी तेरे लिए दुनिया छोड दी है, तुझपे ही साँसे आके रुकी हे गीत अभिनय करत गाऊन श्रोत्यांच्या मनामध्ये प्रेमाची ज्योत पेटवली.
पाचंगे कृष्णा विजय यांनी अभिनय करत ऐ दिल है मुश्किल या गीताने तरुणांच्या ह्दयाची अवस्था व्यक्‍त केली. तर सुरनर पिराजी शिवाजी यांनी    तुझ्या दिलाचा मी चेअरमन या गीतावर नृत्य करुन उपस्थितांच्या दिलावर राज्य केले.
  या वार्षिक स्नेह संमेलनाचे आगळी वेगळी विशेषता म्हणजे मेंटल जिम संकल्पना. आजच्या धावपळीच्या युगामध्ये शारीरिक व्यायाम कसेतरी वेळ काढुन नागरीक करत आहेत मात्र मानसिक / मेंदुला सदृढ कराणारा व्यायाम कोणी करत नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी मेंटल जिम या संकल्पनेतुन मानसिक स्वास्थ कसे चांगले ठेवून मेंदु कसा ताजातवाणा ठेवावा यासाठी मेंटल जिम संकल्पना अभिनय व संवादातुन स्पष्ट केली. यामध्ये मंडले आरती, मुस्तापुरे प्रतिक्षा गुरुनाथ, होळकर सृष्टि शंकरराव, शिवमोरे आदिती हरिराम, कांबळे समृद्धी, बुरुसपट्टे ऋतुजा, सोमवंशी मोहिनी, सोमवंशी वैष्णवी, तांबोळी बुशरा आदींनी उत्कृष्ट रित्या अभिनय करुन मेंटल जिम संकल्पना व्यक्‍त केली.कासले निकिता रावसाहेब यांनी डीजे पे मटकुंगी या गीतावर नृत्य करुन तरुणाईला बसल्या जागेवर नृत्य करण्यास भाग पाडले तर पाचंगे ओम संजय यांनी विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरावर आधारित आहे कोणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला हे गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर सुरनर दिव्या निळकंठ यांनी कमरियॉ साँग या गीतावर नृत्य करुन तरुणाईल कंबर हालविण्यास भाग पाडले. तर रड्डेवाड आरती हिने राबता साँग गावुन श्रोत्यांना खेळवत सोडले. तर धनश्री खेडकर यांनी ऊँगली पकड के तुने हे गीत गायीले. बुगनर शितल ज्ञानेश्वर यांनी तू जानू बनू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामी मोर सामी या गीतावर नृत्य करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. साखरे शिवानी जनार्धन यांनी माऊली माऊली हे गीत गाऊन भक्‍तिमय वातावरण निर्माण केले. मुसने अंजली यांनी माहेरु माहेरु गीत गाऊन श्रोत्यांना पाय थिरकालयला लावले. तर कासले पायल शिवाजी यांनी डुलकीच्या तालावर या गीतावर नृत्य करुन उपस्थितांना आनंदित केले.
आज भ्रष्टाचाराने देश ग्रासला आहे यावर भ्रष्टाचार भस्मासुर हे नाटक प्रस्तुत करुन पाचंगे कृष्णा, डुबुकवाड ओमकार, रेनेवाड जगदिश, सुरनर पिराजी, शेख अस्सलान, शेख रेहान यांनी भ्रष्टाचारमुक्‍त भारत करण्याची भावना उपस्थित श्रोत्यांचा मनामध्ये निर्माण केली. तर चौधरी स्नेहा, सोनाली लिंबाळे, प्राची दुधेवाड, ऋतुजा कांबळे, श्रदधा हारगिले, पायल बनसोडे, कासले निकिता यांनी समुह नृत्य करुन टेंशन रहीत जीवन कसे जगावे हे सांगितले. तर
शिवपुजे तनुश्री अनिल यांनी अधीर मन झाले हे गीत गाऊन श्रोत्यांच्या मनाला चुटका लावून सोडले तर चव्हाण दिक्षा देविदास मेरी माँ के बराबर कोई नहीं हे गीत गाऊन उपस्थितांमध्ये मातृत्व भावना निर्माण केली. तर कांबळे बुद्धप्रिया प्रकाश यांनी चल तेरे इश्क में पड जाते या गीतावर नृत्य करुन उपस्थितांना हैराण करुन सोडले तर कांबळे शुभांगी बालाजी माझ्या डोळ्यातील काजळ या गीतावर नृत्य करुन उपस्थितांच्या ह्दयाचा ठेका चुकवला, तर नामपल्ले राजकुमारी झुमका वाली पोर या गीतावर नृत्य करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
पाचंगे ओम संजय यांनी माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं हे गीत गाऊन श्रोत्यांच्या मनामध्ये शौर्य निर्माण केले. तर सोमवंशी मोहीनी लाँग लाची या गीतावर अप्रतिम नृत्य केले. सुर्यवंशी वैष्णवी शरारा शरारा मैं हूँ एक शरारा या गीतावर नृत्य करुन उपस्थितांच्या मनामध्ये आग पेटवली. तर हाके प्रांजली, कांबळे संस्कृती, काबलिया रोहिणी, राजकुमारी नामपल्‍ले यांनी जानु विना करमत नाय या गीतावर नृत्य करुन प्रेक्षकांना बेचैन करुन सोडले. शेवटी विद्यार्थी व विद्यार्थींनीचा समुह नृत्यांनी उपस्थितांना संगीताच्या सुरेल लहरीवर नाचायला भाग पाडले.
माझी सख्खी बायको गेली या गाण्यावर विद्यार्थ्यांनी बहारदार जोशपुर्ण नृत्य केले.
सदरील कार्यक्रमाचे बहरदार सुत्रसंचलन प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर, प्रा. रवि इरफ ळे यांनी केले.
यावेळी प्राध्यापकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *